Mahashivratri 2023: शिवलिंगावर बेलपत्र अशा पद्धतीने अर्पण करा, जाणून घ्या नियम
Mahashivratri 2023: महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांसाठी सर्वात मोठा उत्सव आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजन केल्यास इच्छित फळ मिळतं अशी धारणा आहे.
मुंबई: हिंदू धर्मात महाशिवरात्रीचं महत्त्व सर्वाधिक असून शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या आराधनेचं उचित फळ मिळतं अशी धारणा आहे.या दिवशी केलेल्या पूजेनं भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी येत आहे.या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगवर फळं, फुलं, बेलपत्र इत्यादी अर्पण करतात. भगवान शिवांना बेलपत्र अधिक प्रिय आहे. मात्र बेलपत्र अर्पण करण्याचं एक विशिष्ट पद्धत शास्त्रात सांगितली गेली आहे. अन्यथा बेलपत्र अर्पण करूनही विशेष फायदा होत नाही. तसेच आपली पूजाही अर्धवट असल्याचं मानलं जातं. चला जाणून घेऊयात बेलपत्र वाहण्याची योग्य पद्धत…
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
- निशित काळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत
- पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटं ते रात्री 09 वाजून 46 मिनिटांपर्यंत
- द्वितीय प्रहर – रात्री 09 वाजून 46 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत
- तृतीय प्रहर – 19 फेब्रुवारी, रात्री 12 वाजून 52 मिनिटांपासून 03 वाजून 59 मिनिटांपर्यंत
- चौथा प्रहर –19 फेब्रुवारी, 03 वाजून 59 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत
- पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 02 वाजून 40 मिनिटांपर्यंत
– शिवलिंगावर बेलपत्र कायम उलट करून अर्पण करावं. म्हणजेच पानाची पुढची बाजू शिवलिंगाला स्पर्श झाली पाहीजे. तसेच बेलपत्र अर्पण करताना अनामिका,अंगठा आणि मधलं बोटांचा वापर एकत्रित करावा.
– बेलपत्र झाडावरून तोडताना काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेलपत्र फांदीसह कधीच तोडू नये. बेलपत्र एक एक करूनच तोडवं असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि तोडल्यानंतर नमस्कार करावा.
– तुमच्याकडे काही कारणास्तव बेलपत्र नसल्यास एकच बेलपत्र तुम्ही धुवून पुन्हा अर्पण करु शकता. म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीने बेलपत्र अर्पण केलं असल्यास तेच बेलपत्र पुन्हा धुवून अर्पण करू शकता. पण बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी शिवलिंगाचा जलाभिषेक करा.
-महाशिवरात्रीला पूजेची तयारी करण्यापूर्वी लक्षात बेलपत्र व्यवस्थित असावे. खराब किंवा कापलेले नसावे. असे बेलपत्र अर्पण केल्यास अशुभ फळं भोगावे लागतात.
-बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते व्यवस्थितरित्या धुवून ग्या. त्यानंतर चंदनाने त्यावर राम किंवा ओम नम:शिवाय लिहा. असं केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)