मुंबई : मकर संक्रांती ( Makar Sankranti 2022) हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरेकडे वळतो आणि या दिवसापासून खरमास संपतो. खरमास संपल्यानंतर सर्व प्रकारची शुभ कार्येही संक्रांतीच्या दिवसापासून सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे दान करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी तुमच्या राशीनुसार वस्तू दान केल्यास सूर्यदेवाची विशेष कृपा होते. देवी लक्ष्मी प्रसन्न होते. चला तर मग जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणती वस्तू दान करणे योग्य राहील.
मकर संक्रांतीचा शुभ योग
मकर संक्रांतीचा हा सण रोहिणी नक्षत्रात सुरू होत असून, हा मुहूर्त १३ जानेवारीच्या रात्री ८.१८ पर्यंत असेल. हे नक्षत्र अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते. या नक्षत्रात दान केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळते अशी मान्यता आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, खिचडी, मिठाई, डाळी, गोड तांदूळ आणि लोकरीचे कपडे इत्यादी दान करणे शुभ राहील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी विशेषतः काळे उडीद, मोहरीचे तेल, काळे वस्त्र, काळे तीळ आणि उडीद डाळ खिचडीचे दान करावे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी या मकर संक्रांतीला काळे तीळ, उडीद, खिचडी आणि मोहरीचे तेल गरजूंना दान करावे.
कर्क
या दिवशी हरभऱ्याची डाळ, खिचडी, पिवळे वस्त्र, अख्खी हळद, फळे गरजूंना दान केल्याने देव प्रसन्न होतो.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनी या सणाच्या दिवशी खिचडी, लाल वस्त्र, रेवडी, तिळवडी आणि मसूराची डाळ दान करावी.
कन्या
मकर संक्रांतीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी मूग, खिचडी, शेंगदाणे, हिरवे कपडे इत्यादी दान करावे.
तूळ
या राशीच्या लोकांनी या मकर संक्रांतीला आपल्या क्षमतेनुसार खिचडी, फळे, उबदार कपडे इत्यादी दान करावे.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा
तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…
Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की