मुंबई : अनेकदा असे दिसून येते की मांगलिक दोषामुळे (Mangal Dosh) जीवनात अनेक समस्या येतात. लग्न जुळण्यास विलंब होतो. वैवाहिक जिवनातही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. धन योग्य वेळी मिळत नाही. प्रत्येक कामात यश मिळते, पण त्यासाठी बराच विलंब होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीला गृहस्थाश्रमात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. ज्योतिषाचा सल्ला घेऊन मंगल दोष दूर करण्यासाठी पूजा करावी.
जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल तर उज्जैनच्या अंगारेश्वर महादेवात मंगलदोषाची पूजा करावी. उज्जैनच्या अंगारेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. मंगल दोष निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवनात मांगलिक दोष दिसून येत नाही.
मांगलिक दोष दूर करण्यासाठी वट सावित्री आणि मंगळा गौरीचे व्रत करावे. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. नकळत एखाद्या मांगलिक मुलीचा विवाह दोषरहित व्यक्तीशी झाला तर दोष दूर होण्यासाठी वट सावित्री किंवा मंगळा गौरी व्रताचे पालन करणे फलदायी ठरते.
मंगल दोष दूर करण्यासाठी विवाहापूर्वी गुपचूप पिंपळाच्या झाडाशी लग्न करावे. यामुळे पत्रिकेतील मंगळ दोष दुर होतो. वैवाहिक जिवनात कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
मंगळवारी व्रत ठेवून हनुमानाला शेंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मांगलिक दोषही दूर होतो. याशिवाय भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने हा दोष दूर होतो. महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि शुभ गोष्टी घडतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)