Mangal Ast 2023 : मंगळ ग्रह अस्ताला जाणार असल्याने या राशींच्या अडचणीत होणार वाढ, जाणून घ्या ग्रहमान
Mangal Ast 2023 : ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती राशीचक्रावर प्रभाव टाकत असते. काही ग्रहांचा शुभ तर काही ग्रहांचा अशुभ परिणाम दिसून येतो. मंगळ ग्रह अस्ताला गेला असून तीन राशींना फटका बसणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे ग्रहांची स्थितीवर अवलंबून असते. जन्मावेळी ग्रहांची स्थिती आणि गोचर यामुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. ग्रह वक्री, अस्त, उदय आणि मार्गस्थ स्थितीत असतात. एखादा ग्रह सूर्याच्या जवळ गेला तर त्याचा प्रभाव कमी होतो आणि अस्ताला जातो. सध्या मंगळ हा ग्रह कन्या राशीत विराजमान आहे. त्यात सूर्याने एन्ट्री मारल्याने मंगळाचा प्रभाव कमी झाला आहे आणि अस्ताला गेला आहे. ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह 24 सप्टेंबरपासून अस्ताला जाणार आहे. या स्थितीत पुढचे काही दिवस परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर परिणाम होईल ते…
या तीन राशींना बसणार फटका
मेष : मंगळ ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानात अस्ताला जाणार आहे. मंगळ ग्रहाकडे आयुष्य स्वामित्व आहे. यामुळे गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं आहे. कधी कोण दगाफटका देईल सांगता येत नाही. या कालावधीत अपघात होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळा. तसेच गाडी सावधपणे चालवा. दुसरीकडे ज्योतिषीय उपाय करा. सूर्याला अर्घ्य द्या. तसेच सूर्य मंत्रांचा जप करा.
कर्क : मंगळ ग्रह या राशीच्या करिअर स्थानात अस्ताला जात आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. नोकरीवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण घाबरून जाऊ नका. धैर्याने सामना करा. तसेच देवदर्शन घ्या आणि सकारात्मक विचार करत राहा. यामुळे नक्कीच मार्ग सापडेल. मुलांच्या अभ्यासात दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येईल. व्यवसायात उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.
कन्या : मंगळ ग्रह या राशीच्या तिसऱ्या स्थानाचा स्वामी आहे. त्यात ग्रह यात राशीत अस्ताला जाणार असल्याने 3 ऑक्टोबरपासून अडचणीत वाढ होणअयाची शक्यता आहे. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. रक्ताशी निगडीत संबंधित आजार बळावू शकतात. या कालावधीत वाद होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. सूर्य मंत्राचा जाप करा आणि सूर्याला अर्घ्य द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)