Mangal Gochar : मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश करताच रुचक राजयोगाची स्थिती, तीन राशींना मिळणार साथ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींना अच्छे दिन येतील.
मुंबई : ग्रहांची ठरावीक कालावधीनंतर बदलत असते. त्यानुसार आसपास घडामोडी घडतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. राहु आणि केतु हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहाची स्वरास आहे. त्यामुळे स्वराशीत आल्यानंतर ग्रह चांगली फळं देतो अशी मान्यता आहे. ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह नोव्हेंबर महिन्यात स्वरास असलेल्या वृश्चिकेत प्रवेश करणार आहे. यामुळे रूचक राजयोग तयार होणार आहे. या योगाचा संपूर्ण राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशींना या योगामुळे चांगला फायदा होईल असं चित्र आहे. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल असं ग्रहमान असेल. चला जाणून कोणत्या तीन राशींना लाभ मिळणार ते..
या तीन राशींना मिळणार लाभ
वृश्चिक : ही मंगळाची स्वरास आहे. त्यामुळे या राशीत प्रवेश करताच या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावेल. तसेच निर्णय घेण्याची क्षमता दुपटीने वाढेल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील हे विशेष राहील. जीवनात काही सकारात्मक बदल घडतील. कामाच्या ठिकाणी काही चांगल्या गोष्टी घडतील. गेल्या काही दिवसांपासून होत नसलेलं कामंही पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
सिंह : या राशीच्या चतुर्थ स्थानात मंगळ ग्रह स्थित असणार आहे. यामुळे जमिनीसंबंधित व्यवहार पूर्ण होतील. तसेच मोठा फायदा होईल. तसेच जमिन खरेदी कराल आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे भौतिक सुखांची अनुभूती घेता येईल. गाडी खरेदी कराल. तसेच सोनं चांदीत गुंतवणूक फलदायी ठरेल. व्यवसायात प्रगती दिसून येईल आणि विस्तार करण्यास मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
मकर : या राशीच्या जातकांना मंगळामुळे तयार झालेला रूचक राजयोग फलदायी ठरेल. कारण कर्म स्थानात हा योग तयार होत आहे. जीवन सुलभ होईल. तसेच एखादी कटकट कायमची दूर होईल. विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासात प्रगती दिसेल. स्पर्धेत चांगल्या गुणांची कमाईल होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. सासरच्या मंडळींकडून धनलाभ होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)