Mangal Gochar : 18 ऑगस्टपर्यंत मंगळ ग्रह देणार भरभरून, या राशींच्या जातकांचे प्रश्न लागणार मार्गी

रोजच्या आयुष्यात ग्रहांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. त्यामुळे गोचर कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानात आहे याकडे लक्ष असतं. मंगळाची स्थिती अशीच असून राशीचक्रावर परिणाम दिसणार आहे.

Mangal Gochar : 18 ऑगस्टपर्यंत मंगळ ग्रह देणार भरभरून, या राशींच्या जातकांचे प्रश्न लागणार मार्गी
Mangal Gochar : 18 ऑगस्टपर्यंत सहा राशींना मिळणार मंगळाची साथ, अडकलेली कामं होणार पूर्ण
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 2:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहाने गोचर केल्यानंतर काही परिणाम होतो याचं भाकीत केलं जातं. त्यामुळे जातकांना एकंदरीत अंदाज घेऊन पावलं टाकण्यास मदत होते. पण असं असलं तरी वैयक्तिक कुंडलीत ग्रह कोणत्या स्थानात आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. मंगळ या राशीत 49 दिवस राहणार आहे. म्हणजेच 18 ऑगस्टपर्यंत या राशीत असणार आहे. 18 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजून 12 मिनिटांनी मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल.

मंगळ ग्रह आणि राशीचक्रावरील परिणाम

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला पापग्रह म्हणून संबोधलं जातं. असं असलं तरी नवग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. खासकरून आठ राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

मेष : या राशीच्या जातकांना मंगळ गोचराचा फायदा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. जागेशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. विदेशात जाण्याची संधी या काळात मिळू शकते.

मिथुन : या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. उद्योग धंद्यात फायदा होऊ शकतो. शौर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. शत्रूवर सहज विजय मिळवला.नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोश मिळू शकते.

सिंह : या राशीच्या जातकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. कुणाला उधारी दिलेले पैसे य काळात मिळू शकतात. या काळात वाहन, घर किंवा जमीन खरेदी करण्याचा योग जुळून येईल. पण कौटुंबिक पातळीवर कलह पाहायला मिळू शकतो.

तूळ : मंगळाची साथ या राशीच्या जातकांना मिळेल. उद्योग धंद्यात चांगला नफा मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. तसेच एखादं नवं काम हाती लागू शकते. तसेच आर्थिक उत्पन्न वाढेल. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

वृश्चिक : मंगळ गोचर कालावधीत कठीण काम सोपं होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नात आणि प्रतिष्ठेची वाढ होऊ शकते. लव्ह लाईफ चांगली राहील. घरात मंगळ कार्य होऊ शकते.

मीन : मंगळ गोचर या राशीच्या जातकांसाठी फलदायी ठरू शकते. मनासारखं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण राहील. 18 ऑगस्टपर्यंत नशिबाची साथ मिळेल. समाजात मान सन्मान वाढू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.