Astrology : 69 दिवस या राशींना मंगळ देणार साथ, मिथुन प्रवेश ठरणार फलदायी
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीबदल करतो. या राशी बदलाचा सामन्य जीवनावर आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व आहे. असं पाहिलं तर कोणता ना कोणता ग्रह गोचर करत असतो. तो ग्रह त्याच्या स्थानानुसार फळं देत असतो. त्यामुळे गोचर कालावधीत या राशीला चांगले, तर कधी त्या राशीला चांगले दिवस येतात. आता ग्रहांचा सेनापती म्हणून दर्जा असलेला मंगळ ग्रह गोचर करण्यास सज्ज आहे. वृषभ राशीतून 13 मार्च 2023 रोजी मिथुन राशीत गोचर करणार आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीत नवम पंचम योग तयार करत आहे. मंगळ या राशीत 69 दिवस राहणार आहे. त्यामुळे पाच राशींना मंगळाचं पाठबळ मिळेल.
या कालावधीत सूर्य आणि बुध ग्रहही राशी बदल करणार आहे. पण मंगळाच्या गोचरामुळे काही राशींना फायदा होणार आहे. या राशीच्या जातकांची शक्ती आणि पराक्रमात फरक दिसून येईल. कारण मंगळ हा पराक्रमकारक ग्रह आहे. त्यानुसार मंगळ आपली फळं राशींना देणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या लकी राशी आहेत.
या राशींवर मंगळ गोचराचा शुभ परिणाम
मेष – मंगळ गोचर या राशीसाठी शुभ फळं देणारा असेल. या राशीचा स्वामीही मंगळच आहे. त्यामुळे दुहेरी बळ मिळणार आहे. या काळावधीत आत्मविश्वास वाढल्याने अडकलेली कामंही पूर्ण कराल. रोजगाराच्या नव्या संधी चालून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – मंगळ ग्रह या राशीत गोचर करून 69 दिवस ठाण मांडून बसणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना विशेष फायदा होईल. या काळात प्रतिकार क्षमता दुप्पटीने वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. मोठे करार निश्चित करू शकाल. भागीदारीच्या धंद्यातून नफा होण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान मिळेल.
सिंह – या राशीच्या जातकांनाही मंगळाची साथ मिळणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून विशेष लाभ होईल. ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगलं फळ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत या काळात निर्माण होतील. न्यायालयातील प्रकरणात यश मिळेल.
कन्या – या राशीच्या जातकांनाही मंगळाची साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच मालकाकडून कौतुकाची थाप पडेल. आत्मविश्वास या काळात दुप्पटीने वाढेल.
मकर – मंगळ गोचराचा मकर राशीच्या जातकांना फायदा होईल.या काळात चांगल्या जॉबची ऑफर चालून येईल. कौटुंबिक वातावरणही या काळात चांगलं राहील. आईकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)