मार्च महिन्यात ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे चार राशींची डोकेदुखी वाढणार, नेमकं काय ते जाणून घ्या

मार्च महिन्यात ग्रहांची उलथापालथ पाहायला मिळणार आहे. काही ग्रहांची स्थिती अनुकूल तर काही ग्रहांची स्थिती प्रतिकूल स्थिती निर्माण करेल. या काळात चार राशींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

मार्च महिन्यात ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे चार राशींची डोकेदुखी वाढणार, नेमकं काय ते जाणून घ्या
Astro 2023: मार्च महिन्यात ग्रहांची अशी स्थिती, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 7:29 PM

मुंबई : मार्च महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांना या महिन्यात ग्रहांची साथ मिळणार का? असा प्रश्न पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना खास असणार आहे. या महिन्यात बुध,शनि, सूर्य आणि शुक्र आपली स्थिती बदलणार आहेत. यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर ग्रहमंडळातील स्थितीमुळे मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम दिसून येईल. शनिदेवांचा कुंभ राशीत उदय, कुंभ राशीत सूर्य आणि बुधाचं अस्तित्त्व आणि शुक्राचा गोचर यामुळे राशीचक्रात बऱ्याच घडामोडी घडणार आहे.

शनिदेव 6 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी कुंभ राशीत उदीत होणार आहेत. याच राशीत सूर्य आणि बुध ग्रह ठाण मांडून आहेत. त्यामुळे शनिच्या उदीत अवस्थेमुळे वृषभ, सिंह, तूळ आणि कुंभ राशीला फायदा होईल. त्यानंतर 15 मार्चला सूर्यदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील. तर शुक्र ग्रह 12 मार्चला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा धन, सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह सकाळी 8 वाजून 13 मिनिटांनी मार्गक्रमण करणार आहे.

या चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

मेष : या राशीत राहु आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे कौटुंबिक कलह वाढू शकतो. या काळात मेहनत केल्यानंतरही अपेक्षित फळ मिळणार नाही. तब्येतीचा प्रश्न वारंवार येऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल नसेल.

सिंह : या राशीवर सूर्यदेवांची नजर असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक स्थितीचा करावा लागू शकतो. या काळात आर्थिक अडचण प्रकर्षाने जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यविषयक प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रीत करा.

कन्या : मार्च महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे निर्माण होणारी स्थिती कन्या राशीसाठी अडचणीची ठरेल. आर्थिक संकट या काळात तुमच्या डोक्यावर घोंघावणार आहे. व्यावसायिकांना या काळात तोटा सहन करावा लागेल. तसेच भागीदारीच्या धंद्यात फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ : या राशीच्या जातकांना सुरुवातीचा महिना तसा चांगला जाईल. पण ग्रहांच्या गोचरानंतर बदल झालेला दिसून येईल. जातकांना कामाच्या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्याल. कौटुंबिक वाद या काळात वाढू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.