Astrology 2023 : 18 ऑगस्टपासून तीन राशींचं नशिब पालटणार, मंगळ ग्रहाची असेल विशेष कृपा
मंगळ ग्रहाला नवग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. तापट आणि आक्रमक स्वभावामुळे ग्रहांचं नेतृत्व करतो. 18 ऑगस्टपासून मंगळ ग्रहाची स्थिती तीन राशींना फलदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशींबाबत..
मुंबई : नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. तसेच चांगली वाईट फळं प्रत्येकाला अनुभवता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा भूमिपूत्र आहे. तसेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन बऱ्यात घडामोडींना निमंत्रण देत असं म्हणायला हरकत नाही. मंगळ 18 ऑगस्टला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना मंगळ ग्रहाची चांगली साथ मिळेल. अचानक धनलाभ किंवा प्रगती होताना दिसेल. चला जाणून घेऊयात या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना लाभ मिळेल ते…
या राशीच्या जातकांना मिळेल लाभ
मेष : या राशीच्या सहाव्या स्थानात मंगळ ग्रह येणार आहे. हे स्थान शत्रू आणि रोगाचं कारक असतं. यामध्ये मंगळ येणार अल्याने साहस आणि पराक्रमात वृद्धी होईल. शत्रूपक्षाची संपूर्ण खेळी एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाकाल. या काळात विदेशात जाण्याचा योगही जुळून येईल. उत्पन्नात वाढ होईल आणि कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळण्याची शक्यता आहे.
मीन : मंगळ ग्रहाची स्थिती या राशीच्या जातकांना लाभदायी ठरू शकते. कारण मंगळ या राशीच्या सप्तम भावात गोचर करणार आहे. त्याचबरोबर धन आणि भाग्य स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत या काळात तयार होतील. पत्नीने केलेल्या आर्थिक नियोजनामुळे ताकद वाढेल.
कर्क : या राशीच्या जातकांना मंगळ ग्रहाची उत्तम साथ मिळेल. या राशीच्या तिसऱ्या स्थानात मंगळ गोचर करणार आहे. यामुले कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती एकदम चांगली राहील. उत्पन्नात वाढ झाल्याने काही प्रश्न सोडवता येतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)