दिवाळीनंतरही या राशींवर असेल माता लक्ष्मीची कृपा, मार्गी गुरुमुळे होणार मोठा धनलाभ
एखाद्या ग्रहाचे राशी परिवर्तन हे जोतिषशास्त्रात फार महत्त्वाचे मानल्या जाते. दिवाळीनंतर गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. जाणून घेऊया याचे काय परिणाम होणार
मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार,(Astrology) ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पडतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ होत असतो. त्याचबरोबर दिवाळीचा सण लवकरच साजरा होणार आहे. दिवाळीनंतर गुरु ग्रह राशी बदल करणार आहे. बृहस्पती मिन प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे 4 राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना गुरु ग्रहामुळे खूप फायदा होणार आहे.
- कुंभ- ज्योतिषशास्त्रानुसार गुरु कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. जे कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. या काळात धनलाभ होण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी प्रशंसाही होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे.
- कर्क- कर्क राशीच्या नवव्या घरात गुरु ग्रह मार्गी होणार आहे. कर्क राशीच्या लोकांना गुरूच्या राशीबदलामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गुरु पूर्णपणे मार्गी होताच या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक लोक सहलीला जाऊ शकतात. नफा होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित व्यवसायातून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
- मिथुन- मिथुन राशीच्या लोकांच्या दहाव्या घरात गुरु मार्गी होणार आहे. यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. नोकरदार लोकांसाठी नव्या नोकरीची ऑफर येऊ शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. धनलाभ होऊ शकतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)