राजकारण ठेवा बाजूला नाहीतर आजची दुर्मीळ खगोलीय घटना मिस कराल; पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी एका सरळ रेषेत पाहण्याची संधी
अनेक ग्रहांच्या समायोजनामुळे ही खगोलीय घटना दुर्मीळ झाली आहे. 24 जून रोजी म्हणजेच थोड्याच वेळात ही खगोलीय घटना सूर्योदयाच्या 45 मिनिटे आधी पाहता येणार आहे. सुर्यास्तानंतर हे ग्रह आपापसात विखुरले जाणार आहेत. उद्या म्हणजेच 25 जून रोजीही काही प्रमाणात हा योग पहायला मिळणार आहे.
मुंबई : महाराषष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय संघर्षामुळे सगळ्यांचेच लक्ष याच घडामोडींकडे लगाले आहे. मात्र, आज पृथ्वीपलिकडे सौरमंडळात अत्यंत दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे. पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी एका सरळ रेषेत पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आजच 24 जून रोजी हा अविष्कार पहायला मिळणार आहे. पृथ्वीपलिकडे सौरमंडळाच्या ग्रहांचे स्वतःचे अद्भुत जग आहे. त्यांचे अनोखे सौंदर्य एकत्र पाहण्याची संधी अनेक दशकांनंतरच मिळत असते. अशीच संधी आज 24 जून रोजी आली आहे. या दुर्मीळ खगोलीय घटनेत पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी एका सरळ रेषेत दिसणार आहेत.
बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह एका सरळ रेषेत दिसणार
बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह क्षितिजापासून सुमारे 75 अंशाच्या कोनात किंचित झुकत जवळजवळ एका सरळ रेषेत दिसणार आहेत. आर्यभट्ट निरीक्षण विज्ञान संशोधन संस्थेचे वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. शशिभूषण पांडे यांनी याबाबत माहिती दिली.
सूर्योदयाच्या 45 मिनिटे आधी हा योग पहायला मिळणार
क्षितिजापासून थोडे वर पाहिल्यास पूर्वेला बुध ग्रह दिसतो. सूर्यापासून जास्त अंतर असल्यामुळे बुध ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहणे सोपे होणार आहे. त्याच्या वरच्या बाजूला शुक्र, नंतर मंगळ, नंतर गुरू म्हणजेच शनि गुरूच्या शेवटी दिसेल. दरम्यान, चंद्रदेखील शुक्र आणि मंगळाच्या मध्ये असेल. अनेक ग्रहांच्या समायोजनामुळे ही खगोलीय घटना दुर्मीळ झाली आहे. 24 जून रोजी म्हणजेच थोड्याच वेळात ही खगोलीय घटना सूर्योदयाच्या 45 मिनिटे आधी पाहता येणार आहे. सुर्यास्तानंतर हे ग्रह आपापसात विखुरले जाणार आहेत. उद्या म्हणजेच 25 जून रोजीही काही प्रमाणात हा योग पहायला मिळणार आहे.
असा योगायोग पुन्हा 2040 मध्ये दिसणार
पाच ग्रहांचा संयोग ही एक दुर्मीळ खगोलीय खगोलीय घटना आहे. यानंतर हा योगायोग 2040 मध्ये घडेल. आभासी अंतराच्या बाबतीत सर्व ग्रह एकमेकांच्या जवळ दिसणार असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील परस्पर अंतर लाखो किमी असणार आहे. आकाशीय सौंदर्याच्या दृष्टीने खगोलप्रेमींसाठी ही घटना नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.