आयुष्यात खूप सोसलं आता नशीबाचं दार उघडणार; चंद्र, मंगळ युती करणार कमाल, या राशींच्या लोकांसाठी शंभर वर्षातील दुर्मिळ योग
नव वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येणारं नवं वर्ष आपल्याला कसं जाणार? नव्या वर्षामध्ये आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते.
नव वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येणारं नवं वर्ष आपल्याला कसं जाणार? नव्या वर्षामध्ये आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार? नव्या वर्षात आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्ष 2025 हे ग्रह आणि नक्षत्राच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असं आहे.
नव्या वर्षामध्ये अनेक ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहेत, त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या राशींच्या लोकांवर वेगवेगळा होणार आहे.एक जानेवारीला चंद्राचं राशी परिवर्तन होत आहे. चंद्राच्या राशी परिवर्तनाचा तीन राशींना मोठा फायदा होणार असून, वर्षभर लक्ष्मीची कृपा या राशींच्या लोकांवर राहणार आहेत. जाणून घेऊयात या राशींबद्दल.
एक जानेवारीला चंद्र स्व राशीमध्ये प्रवेश करत आहे. मकर ही चंद्राची रास म्हणून ओळखली जाते. तिथे मंगळ आधीपासूनच सातव्या घरात विराजमान आहे.त्यामुळे या युतीमुळे धनयोग नावाचा राजयोग तयार होत आहे. ज्याचा फायदा हा तीन राशींना होणार असून, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा वर्षभर राहणार आहे.वृषभ, कर्क आणि वृश्चिक राशीला या युतीचा फायदा होणार आहे.
चंद्र आणि मंगळाची युती ही वृषभ राशींच्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे. वृषभ राशींच्या लोकांसाठी नव्या वर्षात अचानक मोठ्या धन प्राप्तीचा योग बनत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं एखाद काम अडकलं असेल तर ते नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कर्क राशींच्या लोकांना देखील चंद्र आणि मंगळाची ही युती फलदायी ठरणार आहे. अनेक शुभ योग तुमच्या आयुष्यात बनत आहेत. आर्थिक उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्त्रोत तुम्हाला मिळतील, तसेच अचानक धनलाभाचा योग देखील निर्माण होत आहे.जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये पगारवाढीसह प्रमोशनचा योग आहे.
वृश्चिक रास – वृश्चिक राशींच्या लोकांसाठी देखील चंद्र आणि मंगळाची ही युती शुभ आहे, आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम या काळात पूर्ण होऊ शकतं