Rajyog : चंद्राच्या गोचरामुळे शशि राजयोगाची स्थिती, तीन राशींना मिळणार लाभ

Shashi Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत चंद्र हा सव्वा दोन दिवस ठाण मांडून असतो. चंद्राच्या सध्याच्या स्थितीमुले शशि राजयोग तयार झाला आहे. तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.

Rajyog : चंद्राच्या गोचरामुळे शशि राजयोगाची स्थिती, तीन राशींना मिळणार लाभ
Rajyog : चंद्राने वृषभ राशीत प्रवेश करताच सव्वा दोन दिवसांसाठी तयार केला शशि राजयोग, तीन राशींना फायदेशीर
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 4:07 PM

मुंबई : ग्रहांच्या स्थितीमुळे कामाची गणितं बदलत असतात. काही ठिकाणी कामं होतात तर काही जणांना अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रहांच्या प्रभावामुळे असं होत असतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे कायम लक्ष लागून असतं. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत वेगाने गोचर करतो. त्यामुळे मनावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. दुसरीकडे चंद्र गोचरासोबत त्याच्या कलाही बदलत असतात त्याचाही प्रभाव दिसून येतो. चंद्र जेव्हा वृषभ आणि कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा राजयोग तयार होतो. 4 ऑक्टोबरला चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे शशि राजयोग तयार झाला आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : या राशीतच शशि राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील.काही योजना राबवण्यात यश मिळेल. तसेच तणावातून मुक्ती मिळेल. एखादा निर्णय पथ्यावर पडेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. उद्योगपतींचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तसेच नशिबाची उत्तम साथ मिळेल.

कर्क : या राशीच्या जातकांना शशि राजयोगाचा जबरदस्त फायदा होईल. राजकारण आणि सरकारी नोकरी करत असलेल्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. मनासारखा जॉब किंवा एखाद्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. या कालावधीत आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. त्यामुळे निर्णय क्षमता वाढेल. समाजात मानसन्मान वाढेल. आयात निर्यातीच्या व्यवसायात चांगलं यश पदरी पडेल.

वृश्चिक : या राशीच्या जातकांना शशि राजयोग लाभदायी ठरेल. अचानध धनलाभ होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत तयार होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील.प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. आरोग्याच्या तक्रारी या कालावधीत दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.