13 ते 15 मार्च 2023 पर्यंत चंद्र असणार वृश्चिक राशीत, कसा असेल गोचर कालावधी जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. त्यामुळे चंद्राची फळं अल्प काळासाठी असतात. तसेच चंद्र कोणत्या ग्रह सोबत युती आघाडी करतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं.
मुंबई : चंद्राचा गोचर कालावधी हा सर्वात वेगाने असतो. चंद्र हा महिन्याभरात 13 ते 14 वेळा गोचर करतो. त्यामुळे चंद्र राशी भ्रमण करत असताना इतर ग्रहांसोबत युती आघाडी करत असतो. 10 मार्च ते 13 मार्च या कालावधीत चंद्र तूळ राशीत असणार आहे. त्यामुळे चंद्र आणि केतुच्या युतीमुळे ग्रहण योग जुळून येणार आहे. त्यामुळे जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यानंतर चंद्र 13 मार्च (सोमवार) 2023 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सोमवारी पहाटे 2.18 मिनिटांनी वृश्चित राशीत सव्वा दोन दिवसांसाठी राहणार आहे. त्यानंतर 15 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल.
वृश्चिक राशीत सध्या कोणताही ग्रह नाही. त्यामुळे युती आघाडीचा प्रश्न येत नाही. पण कृष्ण पक्षातील क्षीण झालेला चंद्र मानसिक चलबिचल निर्माण करणारा राहील. वृश्चिक राशीला सध्या शनिची अडीचकी सुरु आहे. असं असलं तरी चंद्र पहिल्या स्थानात चांगली फळं देतो.
चंद्र गोचर 13 मार्च ते 15 मार्च 2023
- वृश्चिक- पहिल्या स्थानात
- तूळ- दुसऱ्या स्थानात
- कन्या- तिसऱ्या स्थानात
- सिंह- चौथ्या स्थानात
- कर्क- पाचव्या स्थानात
- मिथुन- सहाव्या स्थानात
- वृषभ- सातव्या स्थानात
- मेष- आठव्या स्थानात
- मीन- नवव्या स्थानात
- कुंभ- दहाव्या स्थानात
- मकर-अकराव्या स्थानात
- धनु- बाराव्या स्थानात
चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत असेल तर चांगलं फळ मिळतं. तर इतर स्थानात त्याची फळं त्रासदायक ठरू शकतात. चंद्राच्या गोचरामुळे कुंडलीत अल्प काळासाठी काही योगही तयार होतात. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अडकलेली कामंही तात्काळ मार्ग लागतात.
चंद्राचं स्थान त्याची फळं
- चंद्रानं पहिल्या स्थानात गोचर केल्यास जातकाला चांगली बातमी मिळते. सव्वा दोन दिवसात चांगली फळं मिळतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरतो. मेहनतीला अपेक्षित फळ मिळतं.
- चंद्राचं तिसऱ्या स्थानातील गोचर यश मिळवून देण्यास अनुकूल असतो.तुमचा मानसन्मान या काळात वाढू शकतो. तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येते.
- चंद्राचं सहाव्या स्थानातील गोचरामुळे तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची उर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर कराला. तुमच्या जोडीदार आणि कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.तुमचा मित्रपरिवार या काळात वाढेल.
- चंद्राचं दहाव्या स्थानात गोचर होताच चांगलं फळ मिळेल. व्यवसायातही या काळात फायदा होईल. तुमचे सहकारी तुमच्या कामावर खूश राहतील. त्यामुळे काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंददायी राहिल. या काळात नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)