चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत करणार प्रवेश, कसा असाल 15 ते 17 मार्च 2023 पर्यंतचा कालावधी? जाणून घ्या

वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे चंद्राच्या स्थितीचा आधार घेतला जातो. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्याला तीला चंद्र राशी म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा शुभ ग्रह आहे.

चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत करणार प्रवेश, कसा असाल 15 ते 17 मार्च 2023 पर्यंतचा कालावधी? जाणून घ्या
कृष्ण पक्षात चंद्राची धनु राशीत एन्ट्री, सव्वा दोन दिवस कसे असतील जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 3:37 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर आहे. बारा घरांमध्ये कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे, यावरून फलज्योतिष सांगितलं जातं. प्रत्येक ग्रहांचा एक स्वभाव असून कोणत्या स्थानात स्थित आहे, यावरून भाकीत वर्तवलं जातं. ग्रहमंडळात सर्वात वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह म्हणजे चंद्र. दुसऱ्या म्हणजे चंद्र आणि सूर्य हे दोन ग्रह आपल्या डोळ्यांना रोज दिसणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण लगेच कनेक्ट होतो. सूर्य महिनाभर तर चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस राहतो. सध्या चंद्र हा वृश्चिक राशीत असून 15 मार्चला धनु राशीत प्रवेश करणार आहे.

चंद्र हा एक शुभ ग्रह आहे. सौम्य आणि शीतल म्हणून या ग्रहाचं वर्णन केलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मन, माता, मानसिक स्थिती, मनोबल, द्रव्य वस्तू, प्रवास, सुख शांती, धनसंपत्ती, रक्त, डावा डोळा, छाती आदिंचा कारक ग्रह आहे. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. रोहिणी, हस्त आणि श्रवण नक्षत्रांचा स्वामित्व चंद्राकडे आहे. फलज्योतिष हे चंद्राच्या स्थितीवरून वर्तवलं जातं.

चंद्र ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत 15 मार्च 2023 रोजी सकाळी 07 वाजून 33 मिनिटांनी प्रवेश करेल. तसेच 17 मार्चला (शुक्रवार) धनु राशीतून मकर राशीत सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यामुळे यावेळी चंद्रांची स्थिती काही राशींना शुभ तर राशींना अशुभ फळ देईल. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असून यात चुंबकीय शक्ति आहे. समुद्राची भरती ओहोटी चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते.

चंद्र गोचर 13 मार्च ते 15 मार्च 2023

  • धनु- पहिल्या स्थानात
  • वृश्चिक- दुसऱ्या स्थानात
  • तूळ- तिसऱ्या स्थानात
  • कन्या- चौथ्या स्थानात
  • सिंह- पाचव्या स्थानात
  • कर्क- सहाव्या स्थानात
  • मिथुन- सातव्या स्थानात
  • वृषभ- आठव्या स्थानात
  • मेष- नवव्या स्थानात
  • मीन- दहाव्या स्थानात
  • कुंभ- अकराव्या स्थानात
  • मकर- बाराव्या स्थानात

चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत असेल तर चांगलं फळ देतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. तर इतर स्थानात त्याची फळं त्रासदायक ठरू शकतात. चंद्राच्या गोचरामुळे कुंडलीत अल्प काळासाठी काही योगही तयार होतात. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अडकलेली कामंही तात्काळ मार्ग लागतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.