Astro : 10 मार्चला चंद्र करणार तूळ राशीत प्रवेश, केतुमुळे गणित बिघडणार
तूळ राशीत चंद्र आणि केतुची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या युतीला अशुभ युती असं संबोधलं जातं. त्यामुळे जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. त्यामुळे अल्पवधीसाठी काही शुभ-अशुभ ग्रहांसोबत युती होते. शुभ ग्रहांसोबत युती झाली तर शुभ फळ आणि अशुभ ग्रहांसोबत युती झाली तर अशुभ फळ मिळतात. 10 मार्च शुक्रवारी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिटांना तूळ राशीत गोचर करणार आहे. कृष्ण पक्षातील चंद्राची कला या काळात कमी कमी होत जाणार आहे. असं असताना दीड वर्षांसाठी केतु ग्रह या राशीत ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे ग्रहण योग जुळून येणार आहे. त्यामुळे जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागेल.
चंद्र सव्वा दोन दिवस तूळ राशीत असणार आहे. त्यानंतर 13 मार्च 2023 रोजी तूळ राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. पहाटे 2 वाजून 18 मिनिटांनी वृश्चिक राशीत गोचर केल्यानंतर ग्रहण योग सुटेल. चंद्राची राहु किंवा केतुसोबत युती झाल्यास त्याला ग्रहण म्हंटलं जातं. या योगामुळे मानसिक त्रास आणि आईला वेदना होतात.
चंद्र गोचर 8 मार्च ते 10 मार्च 2023
- तूळ- पहिल्या स्थानात
- कन्या- दुसऱ्या स्थानात
- सिंह- तिसऱ्या स्थानात
- कर्क- चौथ्या स्थानात
- मिथुन- पाचव्या स्थानात
- वृषभ- सहाव्या स्थानात
- मेष- सातव्या स्थानात
- मीन- आठव्या स्थानात
- कुंभ- नवव्या स्थानात
- मकर- दहाव्या स्थानात
- धनु- अकराव्या स्थानात
- वृश्चिक- बाराव्या स्थानात
जर कुंडलीत चंद्र आणि केतुची युती असेल तर त्या व्यक्तीला समजून घेणं कठीण होतं. कारण जातक कधी काय करेल याचा नेम नसतो. चंद्राचं अशुभ असण्याची लक्षणं जाणून घेऊयात.
- दूध देणारा प्राणी मृत पावतो.
- मानसिकरित्या त्रास जाणवतो.
- जाणीव क्षीण होत जाते.
- आई आजारी पडण्याचं लक्षण असतं.
- जलस्रोत सुकण्याची शक्यता असते.
चंद्र ग्रह पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या आणि दहाव्या स्थानात गोचर करत असेल तर चांगलं फळ मिळतं. तर इतर स्थानात त्याची फळं त्रासदायक ठरू शकतात. चंद्राच्या गोचरामुळे कुंडलीत अल्प काळासाठी काही योगही तयार होतात. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अडकलेली कामंही तात्काळ मार्ग लागतात.पण केतुसोबत युती असल्याने या काळात चांगली फळं कमी आणि मानसिक त्रास जास्त होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)