Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सच्ची मोहब्बत” या 4 राशींच्या व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करतात, तुमचाही यात सामावेश आहे का ?

आजच्या काळात खरं प्रेम (True Love) मिळणं हे तसं दुर्लभ झालं आहे. आपल्या पैकी प्रत्येकाला खरं प्रेम मिळेलंच हे सांगता येत नाही. पण राशीचक्रातील (Zodiac) काही राशी या खूप प्रामाणिक असतात.

सच्ची मोहब्बत या 4 राशींच्या व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करतात, तुमचाही यात सामावेश आहे का ?
zodiac
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 3:20 PM

मुंबई :  आजच्या काळात खरं प्रेम (True Love) मिळणं हे तसं दुर्लभ झालं आहे. आपल्या पैकी प्रत्येकाला खरं प्रेम मिळेलंच हे सांगता येत नाही. पण राशीचक्रातील (Zodiac) काही राशी या खूप प्रामाणिक असतात. त्यांचा स्वभाव इतरांपेक्षा खूप वेगळा असतो. जगातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. पण तरीही आपल्याला काही लोक भेटतात ज्यांच्या स्वभावात आणि सवयींमध्ये काही साम्य असते. याचे कारण असे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण जन्मापासूनच आढळतात. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत , प्रत्येक व्यक्तीचा या राशींशी संबंध असतो. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते , ज्याचा स्वभाव आणि गुण त्याच्या राशीशी संबंधित लोकांमध्ये असतात. त्यामुळे जेव्हा एकाच राशीचे दोन लोक एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या काही गुणांमध्ये साम्य दिसून येते. काही लोक आयुष्यात कोणाकडेही फार लवकर आकर्षित होतात. हे लोक आयुष्यात अनेकदा प्रेमात पडतात. पण काही लोक एकदा प्रेमात पडतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी

मिथुन मिथुन राशीचे लोक या बाबतीत खूप सच्चे असतात. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी ते उत्सुक असतात. पण एकदा वस्तु त्यांच्याकडे आली तर ते त्यागोष्टीकडे फारसं लक्ष देत नाहीत. ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. ते त्यांच्या जोडीदाराला खूप जपतात.

वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम खूप महत्वाचे असते ते आयुष्यात कोणाच्याही बाबतीत फारसे गंभीर नसतात. ते कोणालाही प्रभावित करण्यास तत्पर असतात. पण जर ते प्रेमात पडले तर मात्र ते त्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतात. आयुष्यभर दुसऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ते आपल्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात.

तूळ तूळ राशीचे लोक संपूर्ण प्रामाणिकपणाने संबंध ठेवतात, परंतु त्यांची सर्वात मोठी समस्या ही आहे की काही काळानंतर ते लोकांना गृहीत धरू लागतात. या प्रकरणामुळे त्यांच्या नात्यात अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत नातेही तुटते.

कुंभ कुंभ राशीचे लोक मुक्त विचारांचे असतात. पण त्यांनाही प्रेम मिळवायचे आहे. त्यामुळे ते अनेकदा गोंधळलेले असतात. अनेकवेळा ते प्रेमात पडतात, परंतु त्यांचे स्वातंत्र्य सोडू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या नात्यात समस्या येऊ लागतात. जेव्हा दोघांमध्ये निवड करण्याचा विचार येतो तेव्हा ते स्वातंत्र्य निवडतात. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप लवकर होते. पण काही काळानंतर नव्या नात्यात येण्यास वेळ लागत नाही. त्यांना प्रेम देण्यासोबतच पूर्ण स्वातंत्र्य देणारा जोडीदार हवा असतो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chankaya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्याच्या कठीण काळात सख्ख्या मित्रासारख्या मदत करतील या 5 गोष्टी

8 march 2022 Panchang | 8 मार्च 2022, आज होणार नारी शक्तीचा सन्मान, जाणून घ्या महिला दिनाचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त

Dream Indication | भयानक स्वप्नांनी रोज दचकून जागे होता? सात उपाय देतील सुखाची निद्रा

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.