Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ राशींच्या सासू सूनांनी राहावं सावध, 30 वर्षानंतर कुंभ राशीत शनि सूर्याची होतेय युती

घरोघरी मातीच्या चुली ही म्हण प्रचलित आहे. म्हणजेच प्रत्येक घरात काही ना काही कारणांवरून कलह असतो. त्यात सासू सूनेचं एकमेकांशी पटणं म्हणजे शक्यच नाही. काही अपवाद सोडले तर घरोघरी हीच व्यथा आहे. त्यामुळे महिनाभर शनि सूर्याच्या तावडीत काही राशी सापडणार आहेत. त्यामुळे या कालावधीत सावध राहणं गरजेचं आहे.

'या' राशींच्या सासू सूनांनी राहावं सावध, 30 वर्षानंतर कुंभ राशीत शनि सूर्याची होतेय युती
30 वर्षांनंतर 'या' राशीच्या सासू सूनांवर शनि-सूर्याची छाया, घरगुती कलह वाढण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 6:05 PM

मुंबई : सासूच्या राशीला सून आणि सूनेच्या राशीला सासू असं आपण गंमतीशीरपणे नेहमी म्हणतो. पण लग्न झालेल्या लोकांनाच सासू सूनेचा कलह काय असतो हे बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे अनेकदा घरी जावंसं वाटत नाही. आईची बाजू घ्यावी की बायकोची अशा दुहेरी कात्रीत मुलगा सापडतो. ही व्यथा घरोघरी आपल्याला पाहायला मिळते. आता असाच काहीसा प्रकार महिनाभर काही राशींना भोगावा लागू शकतो. सध्या सूर्य मकर राशीत आहे. पण फेब्रुवारी महिन्यात शनिच्या कुंभ राशीत येणार आहे. याच राशीत शनि अडीच वर्षासाठी ठाण मांडून बसला आहे. शनि आणि सूर्य एकाच राशीत एकत्र येत आहेत.या पित्रापूत्रांमध्ये साधा विस्तवही जात नाही. असे दोघे एकाच राशीत एकत्र आल्यावर काय होईल हे सांगायला नको. ज्योतिषशाशास्त्रीय भाषेत सांगायचं तर या दोघं शत्रूग्रह आहे. याचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. त्यामुळे ज्या राशींच्या घरात यांचा गोचर असेल त्या त्या प्रमाणे हे दोन ग्रह फळ देतील. खासकरून चतुर्थ, सप्तम आणि अष्टम स्थानावर या दोन्ही ग्रहांचा प्रभाव पडेल.

या राशींवर असेल सूर्य आणि शनिची वक्रदृष्टी

वृश्चिक : या राशीच्या चतुर्थ स्थानात शनि आणि सूर्याची युती होत आहे . शनिची अडीचकी सुरु असताना शत्रू ग्रहाची या स्थानात युती होत आहे. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर परिणामांना भोगावं लागू शकतं. या कालावधीत एखाद्याची प्रकृती बिघडू शकते. तसेच सासू सुनांचं या कालावधीत एकमेकांशी पटणार नाही. विनाकारण वाद होत राहतील. कोणाची बाजू घ्यावी असा प्रश्न पडेल. पण जितकं या दोघांच्या भांडणात पडाल तितका गुंता वाढत जाईल.

सिंह : या राशीच्या सप्तम स्थानात शनि आणि सूर्याची युती होत आहे. यामुळे कौटुंबिक पातळीवर एका पाठोपाठ एक अडचणींचा सामना करावा लागेल. कधी कधी काय होते हेच कळणार नाही. किचन वॉर एकदम टोकाला जाईल. त्यामुळे घरात मन रमणार नाही. बायकोने केलेल्या जेवणाला वारंवार नाव ठेवली जातील. दुसरीकडे सासूलाही सूर्याच्या प्रभावाचा दणका बसू शकतो. त्यामुळे वाद टाळण्यासाठी शांत राहणं गरजेचं आहे.

कर्क : अष्टम स्थानात असलेल्या शनि आणि सूर्याची अशुभ फळं भोगावी लागतील. यशासाठी झुरावं लागेल, पण पदरी फारसं काही पडणार नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. सासू सुनेसाठी महिनाभराचा कालावधी खूपच वाईट असेल. जिथपर्यंत सूर्य गोचर करत नाही तोपर्यंत कलह टोकाला जाईल. त्यामुळे या कालावधीत भांड्याला भांडं लागणार नाही याची काळजी घ्यावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.