नववर्ष 2024 मध्ये शत्रूग्रहांची होणार युती! वर्षाच्या सुरुवातीलाच या राशींचं टेन्शन वाढणार

ज्योतिषशास्त्रात ठरावीक कालावधीनंतर ग्रहांच्या युती आघाडी होत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. काही जणांना सकारात्मक काही जणांना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं. काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं तर काही ग्रहांचं पटत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम जातकांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.

नववर्ष 2024 मध्ये शत्रूग्रहांची होणार युती! वर्षाच्या सुरुवातीलाच या राशींचं टेन्शन वाढणार
नववर्षात पितापुत्रांची होणार युती! एकमेकांशी पटत नसल्याने या राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 3:03 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरासोबत त्यांच्या युती, आघाडी, मित्रभाव, शत्रूभाव या सर्वांचा बारीकसारीक विचार केला जातो. गोचर कुंडली ही ढोबळमानाने गणली जाते. सर्वसमावेश राशीचक्रावर कसा परिणाम होईल याचं भाकीत वर्तवलं जातं. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमान अनुकूल असेल तर त्याचा परिणाम वेगळा होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्रात शुभग्रह आणि पापग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं. तर काही ग्रहांचं अजिबात पटत नाही. अशीच एक सूर्य आणि शनि पितापुत्रांची जोडी आहे. या दोन्ही ग्रहांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. त्यामुळे सूर्य गोचर करत शनिच्या राशीत किंवा शनिसोबत आला की त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. जानेवारीत सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. अर्थात मकर सक्रांतीला सूर्यदेव शनिच्या राशीत असतील. त्यानंतर महिनाभरानंतर कुंभ राशीत गोचर करेल. ही सुद्धा शनिची रास आहे आणि या राशीत खुद्द शनिदेव विराजमान आहेत. त्यामुळे काही काही राशींना फटका बसू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फटका बसणार ते…

या राशींना बसणार फटका

कर्क : या राशीला सध्या अडीचकी सुरु आहे. म्हणजेच अष्टम भावात शनि आणि सूर्याची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना एखादा दुर्धर आजार ग्रासू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतंही काम हाती घेतलं की अडचणींचा डोंगर उभार राहील. त्यामुळे ताक देखील फुंकून पिण्याची गरज आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कन्या : या राशीच्या षष्टम भावात शनि आणि सूर्याची युती होणार आहे. त्यामुळे नकळत नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागेल. अचानकपणे बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडू लागतील. आरोग्याच्या तक्रारींने पुरते हैराण होऊन जाल. न्यायालयीन प्रकरणात अपयश पदरी पडू शकतं. या कालावधीत वाहन हळू चालवा. गुंतवणूक करताना मोठी आर्थिक जोखिम घेऊ नका.

मीन : या राशीच्या द्वादश स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. या राशीच्या शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. या काळावधीत गरजेपेक्षा अधिक पैशांचा खर्च होईल. त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबून जाल. त्यामुळे गरजांना आवर घाला. गरज असेल तरच पैसा खर्च करा. विनाकारण उसनवारी करू नका. नवीन व्यवसाय सुरु करताना काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.