Shani Dev 2025 : नववर्ष 2025 साली या राशीची शनि साडेसाती संपणार! पण…
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं गोचर ठराविक कालावधीनंतर होत असतं. खासकरून शनिदेवांची दृष्टी कोणत्या राशीवर आहे हे महत्त्वाचं ठरतं. कारण शनि साडेसातीसोबत अडीचकी तितकीच महत्त्वाची ठरते. एकाच वेळी राशीचक्रात शनी पाच राशींवर प्रभाव टाकत असतो. चला जाणून घेऊयात शनिच्या 2025 या वर्षातील गोचराबाबत
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचा गोचर कालावधी हा सर्वाधिक काळ आहे. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. त्यामुळे न्यायदेवतेच्या भूमिकेत असलेले शनिदेव भल्याभल्यांना सरळ करतात. त्यामुळे शनिदेव राशीला येणार म्हंटलं की जातकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. येतं नवं वर्ष अर्थान 2025 हे वर्ष राशीचक्रात उलथापालथ करणारं आहे. कारण न्यायदेवता शनिदेव गोचर करणार आहे. शनिदेव आता मेष राशीच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. म्हणजेच साडेसातीचा सुरुवातीचा अडीच वर्षांचा कालावधी सुरु होणार आहे. तर मकर राशीवरील शनिचा प्रभाव दूर होणार आहे. मकर राशीची साडेसाठी संपणार आहे. तर वृश्चिक आणि कर्क राशीची अडीचकी संपणार आहे. शनिदेव 29 मार्च 2025 रोजी गोचर करणार आहे. म्हणजेच मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीला मधला, तर मेष राशीला पहिला टप्पा सुरु होणार आहे. हा टप्पा 3 जून 2027 पर्यंत असणार आहे. त्यामुळे पुढची अडीच वर्षे या तीन राशी शनिच्या प्रभावाखाली असतील. तर धनु आणि सिंह राशीला अडीचकी सुरु होणार आहे.
- मेष राशी : साडेसाती 29 मार्च 2025 ते 31 मार्च 2032 पर्यंत
- कुंभ राशी : साडेसाती 24 जानेवारी 202 ते 3 जून 2027 पर्यंत
- मीन राशी : साडेसाती 29 एप्रिल 2022 ते 8 ऑगस्ट 2029 पर्यंत
- सिंह राशी : अडीचकी 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत
- धनु राशी : अडीचकी 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत
या राशींना मिळणार लाभ
मकर : पुढच्या वर्षी शनि आणि गुरु हे दोन्ही ग्रह राशीबदल करणार आहेत. त्यामुळे मकर राशीला पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्यास हे वर्ष अनुकूल असेल.
तूळ : या राशीच्या जातकांना पुढच वर्ष चांगलं जाणार आहे. शत्रूंवर या कालावधीत मात करू शकाल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो.
मिथुन : शनि आणि गुरुची उत्तम साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. आत्मविश्वास वाढेल. तसेच हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. कौटुंबिक वाद या काळात संपुष्टात येतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)