Padmini Ekadashi | अधिक मासातील पद्मिनी एकादशी या राशींना ठरेल फलदायी, भगवान विष्णुंचा मिळेल आशीर्वाद
29 जुलै 2023 रोजी पद्मिनी एकादशी आहे. अधिकमासातील एकादशी काही राशींच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या...
मुंबई : प्रत्येक महिन्यातील एकादशी ही भगवान विष्णुंना समर्पित आहे. त्यात अधिकमासात भगवान विष्णुंची आराधना केली जाते. त्यामुळे अधिकमासातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. कारण अधिक मास हा दर वर्षांनी येतो. त्यामुळे त्याचं महत्व काही वेगळंच आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मिनी एकादशी म्हंटलं जातं. परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी असंही संबोधलं जातं. अधिक श्रावण मास असून 29 जुलै 2023 रोजी पद्मिनी एकादशई आहे. ही एकादशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादासाठी महत्वाची मानली जाते. असं असताना ही एकादशी राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी ते जाणून घेऊयात
या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
वृषभ : या राशीच्या जातकांना पद्मिनी एकादशी फळणार आहे. याची अनुभूती जातकांना येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच तुमच्या शब्दाचा मान ठेवला जाईल. सकारात्मक विचारांसह पुढे जा आणि कामं पूर्ण करून घ्या. आलेल्या संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे.
कन्या : या राशीच्या जातकांनाही भगवान विष्णुंचा आशीर्वाद मिळेल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तसेच काही गोष्टी झटपट पूर्ण होताना दिसतील. नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे.
तूळ : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घालमेल आता शांत डोक्याने हाताळा. आपल्या हातून चांगलं काम होईल त्यामुळे काळजी करू नका. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसेच मोठं काम निकाली लागल्याने मन प्रसन्न राहील.
धनु : यश मिळवून देणारी ही एकादशी आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक कामात तुम्हाला सकारात्मकपणे बदल दिसेल. शत्रूपक्षावर तुम्ही हावी व्हाल आणि ताबा मिळवाल. तुमच्या बोलण्याने काही जणांना भूरळ पडेल. त्यामुळे शब्द देताना काळजी घ्या.
मकर : घरात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक अडचणी सुटल्याने सुटकेचा निश्वास सोडाल. व्यवहार करताना किंवा गुंतवणूक करताना योग्य आहे की नाही याची शहनिशा करा. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी या काळात होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)