भाग्यवान लोकांच्या हातावर बनते V चिन्ह, जीवनात गाठतात मोठी उंची

ज्या लोकांच्या तळहातावर हे 'V' चिन्ह असते, ते भाग्यवान तर असतातच पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना चांगले मार्गदर्शक भेटतात. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये क्वचितच नकारात्मकता दिसून येते.

भाग्यवान लोकांच्या हातावर बनते V चिन्ह, जीवनात गाठतात मोठी उंची
हातावर V चिन्हImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 4:52 PM

मुंबई : इंग्रजीत व्ही फॉर व्हिक्टरी मानली जाते, तर हस्तरेखा शास्त्रही (Palmistry Marathi) सांगते की हातात व्ही चिन्ह असेल तर तुम्हाला जीवनाची लढाई जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तळहातावर या चिन्हाची उपस्थिती तरुण वयात तुमच्या जीवनात अफाट संपत्ती आणि यश दर्शवते. असे लोकं स्वभावानेही खूप आनंदी मानले जातात. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित आणखी काही खास गोष्टी.

तळहातावर ‘V’ चिन्हाचा अर्थ काय?

ज्या लोकांच्या तळहातावर हे ‘V’ चिन्ह असते, ते भाग्यवान तर असतातच पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना चांगले मार्गदर्शक भेटतात. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये क्वचितच नकारात्मकता दिसून येते. या लोकांना विश्वासू आणि समजूतदार जोडीदार मिळण्याची शक्यताही खूप जास्त असते.

जीवनातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी अनेकदा लोकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त लोकांची गरज असते. ज्या लोकांच्या तळहातावर ‘V’ चिन्ह असते त्यांच्यावर वाईट काळात विश्वास ठेवला जाऊ शकतो. अशी माणसे वाईट वेळ आल्यास मदत करायला सदैव तत्पर असतात. अशा लोकांवर तुम्ही नेहमी आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता.

हे सुद्धा वाचा

मात्र, ‘व्ही’ मार्क असलेल्या सर्वच व्यक्तींना समाजात असा सन्मान आणि प्रेम मिळत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला त्यांना मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते. 35 वर्षांनंतर या लोकांच्या आयुष्यात चांगले बदल येऊ लागतात. करिअर, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत ते वेगाने प्रगती करतात.

तळहातावर V चिन्ह कुठे असावे?

ज्या लोकांच्या तळहातावर तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये V चिन्ह असते, त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. अशा लोकांची विचारसरणी खूप सकारात्मक असते आणि ते कधीही कशावरही घाबरत नाहीत आणि वाईट काळाला ते खंबीरपणे सामोरे जातात.

कौटुंबिक बाबतीतही भाग्यवान

ज्या लोकांच्या हातात V’ चिन्ह असते, अशा लोकांना एक सुंदर कुटुंब मिळते. अशा लोकांना कुटुंबात नेहमीच प्रेम आणि आदर असतो. परस्पर सामंजस्य टिकून राहते आणि प्रत्येकजण कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देतो. असे लोकं स्वभावानेही खूप दयाळू असतात आणि प्रत्येक सुख-दु:खात आपल्या मित्रपरिवाराला साथ देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.