Horoscope 23 May 2022: ‘या’ रशीच्या लोकांना दिवस आनंदात जाणार, तुमची रास पण हिच आहे का? वाचा आजचे राशीभविष्य
कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी? आज तुमचे ग्रह तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
तुळ (Libra) –
आज तुमच्या लोकप्रियतेसोबत जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल. यासोबतच काही राजकीय लोकांशी भेटी होतील, ज्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कोणत्याही सामाजिक संस्थेत तुमचंही महत्त्वाचे योगदान असेल. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करू नका. तसेच, कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करू नका, फसवणुकीचे बळी होऊ शकता. एखाद्या कामावर जास्त विचार केल्याने वेळ वाया जाऊ शकतो. दिवसभर बाहेरील कामा मध्ये बिझी रहाल. कोणताही ठोस निर्णय यशस्वी होईल. नोकरीतील स्थानं मजबूत राहील.
लव फोकस – प्रेमप्रकरणात कौटुंबिक संमतीने लग्नाचे बेत आखले जातील. त्यामुळे ओळख कायम राहील. मुलांच्या शिस्तीमुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.
खबरदारी – स्वास्थ्य ठीक राहील. वातावरणातील बदलांमुळे आळस जाणवेल.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – र
अनुकूल क्रमांक – 6
वृश्चिक (Scorpio) –
धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची राहील. तसेच, असे काही कार्यक्रम घरीही होतील. तुमचा तत्वनिष्ठ दृष्टिकोन तुम्हाला समाजात आदराचे स्थान देईल. कधीकधी काही जुन्या नकारात्मक गोष्टी तुमच्या मनोबलावर वर्चस्व गाजवतात. तुमचा स्वभाव सकारात्मक ठेवा आणि सध्याच्या परिस्थितीवर तुमचं लक्ष केंद्रित करा. तसेच जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. नोकरीत कोणत्याही प्रकारची बदलीची परिस्थिती निर्माण होत आहे. तुमची फसवणूक किंवा विश्वासघात होऊ शकतो. पैसे मिळण्याचे साधन असेल, परंतु त्याच वेळी खर्चा ही जास्त होण्याची शक्यता.
लव फोकस – कुटुंबातील वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्यामुळे राग आणि चिडचिड वाढेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा.
खबरदारी – पचनास जड आहारामुळे लीवरच्या समस्या जाणवू शकतात. अधिकाधिक आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन करणं चांगलं.
शुभ रंग – क्रीम
भाग्यवान अक्षर – व
अनुकूल क्रमांक – 9
धनु (Sagittarius)-
यावेळी, ग्रहस्थिती तुमचे भाग्य वाढवत आहे आणि मुलांशी संबंधित अनेक शुभ कार्ये. या लाभदायक ग्रहस्थितीचा पुरेपूर लाभ घ्या. तुमची सदसद्विवेकबुद्धी आणि आदर्शवाद तुम्हाला घरात आणि समाजात सन्मान मिळवून देईल.परंतु त्याच वेळी व्यावहारिक असणे देखील महत्त्वाचे आहे. जास्त आदर्शवाद स्वतःसाठी हानिकारक असू शकतो. आज मनःस्थिती काहीशी विस्कळीत असेल. आणि मुलाचे अभ्यासाकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. भागीदारी व्यवसायांना आज गती मिळेल. यासोबतच सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही सहकार्याची वृत्ती असेल. पण कायदेशीर किंवा गुंतवणुकीशी संबंधित गुंतागुंत असू शकते.
लव फोकस – नवरा बायकोंनी समतीने घरातील विषयावर विचार करावा. बऱ्याच प्रमाणात समस्यांचे निवारण होईल. कोणत्याही
खबरदारी – पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्याचे कारण आचरट खाणं आहे. हलका आणि पचायला योग्य आहार घ्या.
शुभ रंग – ऑंरेज
भाग्यवान अक्षर – अ
अनुकूल क्रमांक – 3