Astrology: ‘या’ राशींच्या लोकांना नेहमीच असते पैशांची चणचण; सतत याला त्याला पैसे मागत असतात
आपल्या अवती भवती अनेक लोक असे असतात ज्यांना कायमच पैशाची चणचण (Struggle of money) असते. कितीतरी जणांना त्यांना पैसे मागताना तुम्ही पहिले असेल. असे लोकं फारच मितभाषी असतात. पैसे उधार मिळावे यासाठी ते समोरच्याची अनावश्यक स्तुती करतात. ते किती गरजू आहेत हे पटवून देण्यासाठी वाट्टेल ते खोटं बोलतात. एकदा पैसे मिळाले की नंतर ते समोरच्याचा […]
आपल्या अवती भवती अनेक लोक असे असतात ज्यांना कायमच पैशाची चणचण (Struggle of money) असते. कितीतरी जणांना त्यांना पैसे मागताना तुम्ही पहिले असेल. असे लोकं फारच मितभाषी असतात. पैसे उधार मिळावे यासाठी ते समोरच्याची अनावश्यक स्तुती करतात. ते किती गरजू आहेत हे पटवून देण्यासाठी वाट्टेल ते खोटं बोलतात. एकदा पैसे मिळाले की नंतर ते समोरच्याचा फोनही उचलत नाही, आणि मग पैसे देणाऱ्याला प्रचंड पश्चाताप होतो. या राशींच्या लोकांना कामं मिळतात पण त्या कामाचे पैसे कुठे जातात हा एक अध्ययनाचाच विषय असतो. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत (Astrology) .
- सिंह रास- या राशीचे लोकं खूप कष्ट करताना दिसतील पण त्यांच्याकडे पैशांची कायमच चणचण असते. अति महत्वकांक्षी स्वभावामुळे ते उधळपट्टी करतात आणि नंतर खिसा रिकामा झाला की याला त्याला उसने मागत फिरतात.
- कुंभ रास- या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असतो पण व्यवहारशून्यतेमुळे ते तितक्याच गतीने सगळं धन गमावतातही. आर्थिक चणचण सुरु झाल्यानंतर ते जमिनीवर येतात. या लोकांना इतरांसमोर हात पसरवायला अजिबात संकोच वाटत नाही. शिवाय एकदा पैसे मिळाले की त्यांना शोधणे म्हणजे समुद्रात हरवलेले शिंपले शोधण्यासारखे असते.
- कर्क रास- या राशीच्या लोकांना बऱ्याचवेळा पैशांची तंगी असते. उधार उसने असल्याने बऱ्याचदा ते अनोळखी फोन उचलत नाही. तसेच नवीन लोकांना पैसे मागणीसाठी त्यांचा हात कायम पुढे असतो.
- मिन रास- या राशीचे लोकं नको तिथे पैसा खर्च करतात. यांचे पैशांचे गणित सतत बिघडलेलेच असते. एखाद्याने त्यांना आपुलकीने विचारपूस केली तर ते लगेच पैसे मागायला मागेपुढे पाहत नाही.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)