‘या’ ग्रहांच्या दुष्प्रभावाचा राजकीय पक्षांना बसणार मोठा फटका; जोतिष्यशास्त्राच्या मते पुढे काय घडणार?

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय अशी उलथापालथ आपण सगळे बघतोय. या बंडामागे नेमके कारण काय आहे? सरकार पडणार की राहणार? शिवसेना (shivsena) या संकटाला कशी समोर जाणार? खरंच याचा फायदा भाजपाला होणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात काहूर माजवत आहे. मतदानाच्या आधी […]

'या' ग्रहांच्या दुष्प्रभावाचा राजकीय पक्षांना बसणार मोठा फटका; जोतिष्यशास्त्राच्या मते पुढे काय घडणार?
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:48 PM

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय अशी उलथापालथ आपण सगळे बघतोय. या बंडामागे नेमके कारण काय आहे? सरकार पडणार की राहणार? शिवसेना (shivsena) या संकटाला कशी समोर जाणार? खरंच याचा फायदा भाजपाला होणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात काहूर माजवत आहे. मतदानाच्या आधी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात आले. एकही मत फुटू नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली मग नेमके असे काय झाले की, हा राजकीय भूकंप झाला?  याचे चित्र येणाऱ्या दिवसात स्पस्ट होईलच, पण याशिवाय जोतिष्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून येणारा राजकीय काळ कसा असेल याचा अंदाज घेता येऊ शकतो.  जोतिष्यशास्त्राच्या (Astrology) दृष्टिकोनातून पाहिल्यास या सगळ्यामागे ग्रहांचे संक्रमण हे कारण आहे. 27 जूनला मंगळ मेष राशीत संक्रमण करणार आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. तसेच तो शौर्य आणि पराक्रमाचा देखील कारक मानला जातो.

मेष रास ही एक घाव दोन तुकडे करणारी आहे. कुठल्याही प्रकारच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध परिणामाची पर्वा न करता लढा देणे किंवा बंड पुकारणे हा या राशीचा गुणधर्म आहे. या राशीत मंगळ प्रवेश करणार आहे जो आधीच आक्रमक गुणधर्माचा आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मंगळाच्या मेष राशीत संक्रमणाने बूस्टर मिळणार आहे. या काळात मोठ्याप्रमात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे चिन्ह आहे. सत्ता अस्थिर राहील, परंतु याचा फायदा विरोधकांना मिळेल असा नक्कीच नाही. याशिवाय नैसर्गिक आपत्तीचा देखील धोका संभवतो आहे. येणाऱ्या काळात पूर, अतिवृष्टी यांसारख्या समस्यांना समोर जावे लागू शकते. मंगळाच्या मेष राशीत प्रवेशाचा सर्वच राशींवर कमी जास्त प्रमाणात अनिष्ट परिणाम होणार आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती जोतिष्यशास्त्राचा अंदाज आहे. याच्या तथ्यांचा आम्ही कुठलाच दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला कुठल्याही प्रकारे समर्थन देत नाही)   

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.