Astrology 2023 : शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे बऱ्याच घडामोडी घडणार, 16 दिवसांनी राशीचक्रातील तीन राशींचं होणार भलं

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीमुळे बऱ्याच घडामोडी घडत असतात. पापग्रह आणि शुभ ग्रह कोणत्या स्थितीत आहेत यावर बरंच काही अवलंबून असतं. दैत्यगुरु शुक्र सध्या सिंह राशीत 16 दिवसांनी आपली चाल बदलणार आहे.

Astrology 2023 : शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे बऱ्याच घडामोडी घडणार, 16 दिवसांनी राशीचक्रातील तीन राशींचं होणार भलं
Astrology 2023 : राशीचक्रात शुक्राच्या अशा स्थितीमुळे होणार उलथापालथ, 16 दिवसांनी तीन राशींसाठी 'अच्छे दिन'
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 3:11 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्राचं वेगळं असं अस्तित्व आहे. दैत्यगुरु शुक्र भौतिक सुख, आकर्षणाचा कारक आहे. जातकाच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असेल तर जातकाला भौतिक सुखांचा उपभोग घेता येतो. जर शुक्राची स्थिती खराब असेल तर मात्र जातकाच्या वाटेला परिश्रम आणि भौतिक सुखांसाठी धडपड पाहायला मिळते. शुक्र ग्रहाने गोचर करत सिंह राशीत ठाण मांडलं आहे. आता 16 दिवसांनी शुक्र आपली स्थिती बदलणार आहे. म्हणजेच वक्री अवस्थेत जाणार आहे. 23 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी सिंह राशीत वक्री होणार आहे. 23 जुलै ते 7 ऑगस्ट याच राशीत वक्री असणार आहे. त्यानंतर उलट मार्गक्रमण करत कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र ग्रह या स्थितीत 4 सप्टेंबर 2023 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी मार्गस्थ होणार आहे. शुक्राच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतील. तीन राशींना शुक्राचं पाठबळ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

शुक्र या तीन राशींना देणार पाठबळ

मिथुन : शुक्राची वक्री अवस्था या राशीच्या तिसऱ्या स्थानात असणार आहे. हे स्थान भाऊ बहीण आणि पराक्रमाचं स्थान आहे. त्यामुळे शुक्राची स्थिती या राशीच्या जातकांना लाभदायी ठरणार आहे. भावकीचा जमिनीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. तसेच मोठ्या भावाकडून आर्थिक मदत होऊ शकते. त्याचबरोबर बहिणीकडूनही अपेक्षित मदत होईल. या काळात नावलौकिक होईल. समाजात मानसन्मान वाढेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होईल.

सिंह : शुक्र या राशीच्या पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न भावात वक्री होणार आहे. त्यामुळे शुक्रामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. चेहऱ्यावर एक वेगळच तेज दिसून येईल. तुमच्या एन्ट्रीने समोरच्यावर एक वेगळी छाप पडेल. त्यामुळे अडकलेली कामं झटपट होतील. तसेच प्रेमप्रकरणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या बोलण्यान कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या.

तूळ : या राशीच्या एकादश भावात शुक्र वक्री होणार आहे. हे स्थान उत्पन्न आणि लाभाचं स्थान आहे. त्यामुळे उत्पन्नात लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच नव्या गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगली कमाई होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुखाची अनुभूती मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.