Rahu Gochar 2023 : राहु गोचरामुळे पाच राशींचं टेन्शन होणार दूर, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतुला पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. राहुची स्थिती अनेकदा जातकाला जीवन नकोसं करून ठेवते. त्यामुळे या ग्रहांची स्थिती कशी आहे याकडे पाहिलं जातं.

Rahu Gochar 2023 : राहु गोचरामुळे पाच राशींचं टेन्शन होणार दूर, प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश
Rahu Gochar 2023 : राहुच्या गोचरामुळे पाच राशींना मिळणार दिलासा, दीड वर्ष नसेल पापग्रहाचं सावट
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 3:34 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु हे दोन्ही पापग्रह आणि मायावी ग्रह मानले गेले आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच वेळी राशी बदल करत असतात. त्याचबरोबर परस्पर विरोधी असतात. हे दोन्ही ग्रह कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह एका राशीत दीड वर्षासाठी ठाण मांडून बसतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. सध्या राहु मेष राशीत, तर केतु तूळ राशीत विराजमान आहेत. कुंडलीत राहु-केतु हे ग्रह चांगल्या स्थितीत नसतील तर जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो.

30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी राहु मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर केतु तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करतात. 18 मे 2025 पर्यंत हे दोन्ही ग्रह त्या त्या राशीत असणार आहेत. या दीड वर्षांच्या कालावधीत पाच राशींचं नशीब फळफळणार आहे. या राशींना वर्षाच्या शेवटापरयंत चांगला लाभ आणि अनुभव दिसून येईल. चला पाहुयात पाच राशींना कसं फळ मिळणार ते..

पाच राशींना मिळणार सकारात्मक परिणाम

मेष : या राशीच्या जातकांना राहुच्या गोचरामुळे चांगले परिणाम दिसून येतील. विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा बसलेली दिसेल. पैशांची आवक सुरु झाल्याने कामं झटपट पूर्ण होतील. अडकलेली कामं पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. त्याचबरोबर किचकट कामंही पूर्ण होतील. समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि मानसन्मान वाढेल.

वृषभ : या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रगतीचे नवे मार्ग या काळात सापडतील. विदेश दौरा या काळात घडण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. करिअरमध्ये नवी शिखरं या काळात गाठता येतील.

कर्क : या राशीच्या जातकांना राहुची उलटी चाल फलदायी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. या काळात विदेश यात्रा घडू शकते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

तूळ : या राशीच्या जातकांना राहु गोचर फलदायी ठरेल. करिअरमध्ये काही चांगल्या घडामोडी घडतील. एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर पडू शकते. समाजात मानसन्मान वाढेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. धीर धरून एक एक काम पूर्ण करा.

मीन : या राशीत राहु गोचर करून येणार आहे. त्यामुळे सकारात्मक परिणाम देईल अशीच स्थिती आहे. पण आर्थिक स्तरावर काही निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. पण पैशांची बचत करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.