योगायोग! मेष राशीत राहु, गुरु आणि चंद्र येणार एकत्र, सव्वा दोन दिवसात होणार उलथापालथ

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे यावरून भाकीत केलं जातं. कधी कधी दोन पेक्षा जास्त ग्रह एकत्र आल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. अशीच स्थिती मेष राशीत तयार होणार आहे.

योगायोग! मेष राशीत राहु, गुरु आणि चंद्र येणार एकत्र, सव्वा दोन दिवसात होणार उलथापालथ
Astrology 2023 : 10 जुलै ते 13 जुलै 2023 दरम्यान मेष राशीत ग्रहांची विचित्र स्थिती, या राशींनी जरा सांभाळूनच
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 3:53 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची राशीचक्रातील स्थिती खूप काही सांगून जाते. मेष राशीत सध्या गुरु आणि राहु हे दोन ग्रह एकत्रित आहेत. त्यामुळे चांडाळ योगाची स्थिती आहे. दुसरीकडे, चंद्र वेगाने प्रवास करत या राशीत येणार आहे. त्यामुळे मेष राशीत सव्वा दोन दिवसांसाठी त्रिग्रही योग तयार आहे. गुरु, राहु आणि चंद्र यांची युती मेष राशीत होणार आहे. तीन ग्रहांच्या युतीमुळे दोन अशुभ आणि एक शुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग, चंद्र आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. तर चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे शुभ असा गजकेसरी योग तयार होणार आहे.

ग्रहांची कशी असेल स्थिती

ग्रहण योग आणि गजकेसरी योग हा सव्वा दोन दिवसांसाठी असणार आहे. तर 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहु मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. 10 जुलै 2023 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. चंद्र या राशीत 13 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहतील.

या राशींच्या जातकांना सव्वा दोन दिवस बसेल फटका

सिंह : या राशीच्या जातकांना सव्वा दोन दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. शत्रूपक्ष या स्थितीचा फायदा उचलू शकतात. आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने अडचणींचा डोंगर उभा राहील. व्यवसायिकांनाही या काळात मोठा फटका बसू शकतो. अशा स्थितीत गुंतवणूक करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

तूळ : या राशीच्या जातकांनीही सव्वा दोन दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. त्यामुळे गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक पातळीवर काही वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही अडणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

धनु : गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात हाती काहीच लागणार नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अपयश हाती पडू शकतं. कौटुंबिक पातळीवर काही कारणावरून वादाची ठिणगी पडू शकते. आर्थिक स्थिती या काळात ढासळलेली राहील. प्रवास करणं या काळात टाळलं तर योग्य राहील.

वृश्चिक : या राशीच्या जातकांवर ग्रहांचा संमिश्र प्रतिसाद असेल. अशुभ योगामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. तर गजकेसरी योगामुळे काही अडचणींतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी वाद होईल असं वागू नका. देवाणघेवाण करताना काळजी घ्या. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.