Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहु-केतु आणि शनिच्या वक्री चालीमुळे या राशींना बसणार फटका, सावध राहा अन्यथा…

शनिदेव 17 जून 2023 पासून वक्री अवस्थेत असणार आहेत.राहु आणि केतुचा वक्री प्रवासामुळे ताप वाढणार आहे. त्यामुळे एकाच वेळी तीन पापग्रहांची वक्री स्थिती त्रासदायक ठरणार आहे.

राहु-केतु आणि शनिच्या वक्री चालीमुळे या राशींना बसणार फटका, सावध राहा अन्यथा...
तीन पापग्रह एकाचवेळी वक्री अवस्थेत, राशीचक्रातील तीन राशींचा ताप वाढणार
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 6:48 PM

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहु आणि केतु यांना पापग्रहाच्या दर्जा देण्यात आला आहे. हे ग्रह जातकांना जबरदस्त दणका देतात. 17 जून 2023 पासून शनिदेव वक्री अवस्थेत असणार आहे. शनिदेव मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री होत आहेत. शनिसोबत राहु आणि केतुही वक्री अवस्थेत आहे. राहु आणि केतु तसं पाहिलं तर कायम वक्री चाल चालतात. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात तीन मुख्य ग्रह वक्री अवस्थेत असणार आहे. या तीन ग्रहांच्या स्थिचीचा राशीचक्रावर परिणाम होईल. खासकरून तीन राशीच्या जातकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचे सहा महिने तीन राशीच्या जातकांना कठीण असतील, असं ज्योतिष्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या काळात सावध राहणं आवश्यक आहे.

या राशीच्या जातकांनी जरा सांभाळून

सिंह : या राशीच्या जातकांना शनि, राहु आणि केतुच्या वक्री अवस्थेमुळे जबरदस्त फटका बसेल. कामात काही ना काही विघ्न पडताना दिसेल. इतकंच काय तर होणारी कामंही होत नसल्याने अस्वस्थता वाढेल. नशिबाची साथ हवी तशी मिळणार नाही. काही निर्णय तुम्हाला अडचणीत टाकणारे असतील. नोकरी करणाऱ्या जातकांना त्रास सहन करावा लागू शकतो. या काळात वाहन व्यवस्थित चालवा, अपघात घडण्याची शक्यता आहे.

कर्क : शनि, राहु आणि केतुच्या वक्री स्थितीचा फटका या राशीच्या जातकांनाही बसणार आहे. या काळात तणाव सहन करावा लागू शकतो. कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता या काळात आहे. आर्थिक हानी या काळात होऊ शकते. काही कामं होता होता राहतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील.

वृश्चिक : या राशीला शनिची वक्री स्थिती आणि राहु-केतुची नजर चांगलीच महागात पडेल असं चित्र आहे. नवी काम सुरु करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकोत. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात काम करताना विशेष काळजी घ्या. पार्टनरशिपच्या धंद्यात फटका बसू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.