Rahu Ketu Gochar: राहू केतू गोचरमुळे या चार राशींवर होणार परिणाम, लगेच व्हा सावध!
या वर्षाच्या अखेरीस 30 ऑक्टोबर रोजी दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे 4 राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
मुंबई, राहु आणि केतू (Rahu Ketu Gochar) हे दोन्ही ग्रह जेव्हा जेव्हा आपल्या राशीत प्रवेश करतात किंवा त्यांची राशी बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. हे दोन्ही ग्रह यावर्षी आपल्या राशी बदलणार आहेत. राहू-केतू हे छाया ग्रह मानले जातात आणि नेहमी उलटे फिरतात. जोतिष्यशास्त्रात यो दोन्ही ग्रहांना अशुभ ग्रह मानले आहे. त्यांच्या प्रभावामुळे जातकांच्या जीवनात समस्या वाढतात आणि त्यांला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. राहू-केतूच्या प्रतिगामी हालचालीमुळे त्यांच्या संक्रमणास दीड वर्षाचा कालावधी लागतो. या वर्षाच्या अखेरीस 30 ऑक्टोबर रोजी दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे 4 राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
या चार राशींवर होणार प्रभाव
मीन-
दोन्ही छाया ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आगमन झाल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावे लागेल. या लोकांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे. त्यांना कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायातही अशुभ बातमी मिळू शकते.
मेष-
राहू-केतूचे संक्रमण, मेष राशीच्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. खर्च वाढल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढेल. याशिवाय वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
वृषभ-
राहू-केतूच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक टप्यावर अडचणी येऊ शकतात. या लोकांची उधळपट्टी वाढेल. यासोबतच घराचे बजेटही बिघडते. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)