Rahu Nakshatra Transit 2022: राहू ग्रह करतोय नक्षत्र परिवर्तन; ‘या’ तीन राशींवर होणार विशेष परिणाम

वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रह सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये राहू-केतू (Rahu Nakshatra Transit 2022) हे छाया किंवा वायू ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहांच्या यादीत येतात. राहु-केतू जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ घरामध्ये बसतात तेव्हा त्या व्यक्तीसाठी अनेक समस्या आणि अडथळे निर्माण होतात.  राहू-केतू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतात आणि एका राशीतून दुसऱ्या […]

Rahu Nakshatra Transit 2022: राहू ग्रह करतोय नक्षत्र परिवर्तन; 'या' तीन राशींवर होणार विशेष परिणाम
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:29 PM

वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रह सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये राहू-केतू (Rahu Nakshatra Transit 2022) हे छाया किंवा वायू ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहांच्या यादीत येतात. राहु-केतू जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ घरामध्ये बसतात तेव्हा त्या व्यक्तीसाठी अनेक समस्या आणि अडथळे निर्माण होतात.  राहू-केतू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतात आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्यांना सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या वर्षी राहू-केतूने 12 एप्रिल 2022 रोजी त्यांची राशी बदलली होती. सध्या राहू मेष राशीत पूर्वगामी गतीने भ्रमण करत आहे. मेष राशीचा गृहस्वामी मंगळ ग्रहआहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यावेळी (Effect on three zodiac) मेष राशीतील राहूसोबतच सुख आणि वैभव देणारे शुक्रदेवही विराजमान आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि असुरांची देवता शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. अशा स्थितीत राहू आणि शुक्राची जोडी काही राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरेल.

राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ

ज्योतिष शास्त्रानुसार राहू सध्या मेष आणि कृतिका नक्षत्रात आहेत. कृतिका नक्षत्राचा अधिपती सूर्यदेव आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी राहुने कृत्तिका नक्षत्रात प्रवेश केला होता. आता कृतिका नक्षत्राचा प्रवास थांबवून ते भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. 14 जून 2022 रोजी सकाळी 8.15 वाजता राहू प्रवेश करेल.

मेष- मेष ही राशी चक्रातली पहिली राशी आहे आणि राहु गेल्या 2 महिन्यांपासून या राशीत भ्रमण करत आहे. याशिवाय राहूशी मैत्रीचा भाव असलेला शुक्र ग्रहही आधीच मेष राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत शुक्र आणि राहू मेष राशीवर दोन अनुकूल ग्रहांचा संयोग बनत आहेत. मेष राशीच्या लोकांसाठी हे संयोजन वरदानापेक्षा कमी नाही. धनलाभ आणि आर्थिक स्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

वृषभ- वृषभ राशीचा ग्रहस्वामी शुक्र आहे. अशा स्थितीत शुक्र आणि राहू या दोन ग्रहांमध्ये मैत्रीची भावना असल्याने धन, प्रतिष्ठा आणि पद आणि प्रतिष्ठा यामध्ये चांगले परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीत बढती किंवा नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल. आर्थिक स्थितीत आधीक सुधारणा होईल. नवीन व्यवसाय योजना मार्गी लागतील. नफा वाढेल. खर्च आटोक्यात येतील. आरोग्यही चांगले राहील.

तूळ- 14 जून रोजी भरणी नक्षत्रात राहूचे बदल तूळ राशीच्या लोकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नसतील. इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला सर्व प्रकारच्या चैनीच्या सुविधा मिळतील. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत यश मिळेल. नोकरीत चांगल्या सुविधा आणि बढती मिळण्याची चिन्हे आहेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.