Astrology : 31 मार्चपासून मेष राशीत तयार होणार अशुभ त्रिग्रही योग, या तीन राशींचं टेन्शन वाढणार
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी हा वेगळा आहे. त्यामुळे राशी भ्रमण करताना कधी कधी एका राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. त्यामुळे शुभ अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं.
मुंबई : ग्रहांचं एका राशीत कधीच कायमस्वरुपी स्थान नसतं. हे थोड्या अधिक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. त्यामुळे एखाद्या राशीत दोन पेक्षा अधिक ग्रह येतात. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येतात. सध्या मेष राशीत राहु आणि शुक्राची युती आहे. त्यात 30 मार्चला बुध ग्रह मीन राशीत उदीत होणार आहे आणि 31 मार्चला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 31 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत ग्रहांची अशुभ युती अनुभवायला मिळणार आहे. 6 एप्रिलला सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
बुध, शुक्र आणि राहुची युती 31 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे या युतीचा सर्वच राशींवर परिणाम होईल. मात्र तीन राशींना सर्वाधिक फटका बसेल. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्यविषयक तक्रारींसह धनहानी होऊ शकते. ग्रह कोणत्या स्थानात स्थित आहेत ते वाचा
कोणत्या तीन राशींना त्रास होईल जाणून घेऊयात
कन्या – त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. कारण तीन ग्रहांची युती या राशीच्या अष्टम भावात होणार आहे. त्यामुळे या काळात आरोग्य विषयक तक्रारी जाणवू शकतात. या काळात नवीन काम हाती घेणं शक्यतो टाळा. कारण ग्रहांची साथ मिळणार नाही. गुंतवणुकीसाठी हाच नियम लागू होतो. कामाच्या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळेल. या काळात वाहन काळजीपूर्वक चालवा. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीची तब्येत ढासळू शकते.
वृषभ – या राशीच्या जातकांनाही ग्रहांची स्थिती अनुकूल नाही. या राशीच्या धनस्थानात ही युती होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान या काळात होऊ शकतं. जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे पार्टनरशिपच्या धंद्यात काळजी घेणं गरजेचं आहे. गुंतवणूक या काळात न केलेली बरीच राहील. कारण शेअर बाजारात मोठं नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक कलह या काळात होईल.
वृश्चिक – या राशीच्या जातकांनी या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ग्रहांची युती या राशीच्या सहाव्या स्थानात होत आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचबरोबर आर्थिक समस्या उद्भवू शकते. त्यामुळ कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे खर्च करताना काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)