शुक्रामुळे 6 एप्रिलपर्यंत ‘या’ राशींना मिळेल लक्ष्मीची कृपा, अंगकारक योगामुळे कामुकता वाढणार

मेष राशीत राहु आणि शुक्राची युती 6 एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळात 12 राशींंवर परिणाम दिसून येईल. मात्र तीन राशींवर याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येईल.

शुक्रामुळे 6 एप्रिलपर्यंत 'या' राशींना मिळेल लक्ष्मीची कृपा, अंगकारक योगामुळे कामुकता वाढणार
पैसाच पैसा..! मेष राशीत 6 एप्रिलपर्यंत राहु शुक्राची युती, वैवाहिक आणि सेक्स लाईफवर असा पडेल प्रभाव
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 1:45 PM

मुंबई : नवग्रहांमध्ये शुक्राला सुख समृद्धी, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह म्हणून मानलं जातं. सध्या शुक्र ग्रह मंगळाच्या मेष राशीत विराजमान आहे. या राशीत राहु ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे दोन ग्रहांच्या युतीमुळे अंगकारक योग तयार झाला आहे. राहु हा छाया ग्रह, तर असुरांचा देवता शुक्र आहे. शुक्राची युती पापग्रह केतु, राहु किंवा मंगळासोबत झाली तर वेगळाच प्रभाव दिसून येतो. यामुळे जातकांच्या जीवनात कामुकता वाढेल. धन भावावर दृष्टी पडल्याने काही राशीचे जातक मालामाल होतील. जर कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असेल तर धन,ऐश्वर्य, लाभ, सन्मान आणि प्रेम सर्वकाही मिळू शकतं.

मेष राशीत शुक्र आणि राहुची युती झाली आहे. 12 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत ही युती असणार असून यामुळे अंगकारक योग तयार झाला आहे. त्यात मेष राशी ही मंगळाच्या अधिपत्याखाली आहे. राहु आणि शुक्राची युती प्रेमाची भूख वाढवतात. त्यामुळे अनैतिक संबंध जुळून येण्याची शक्यता असते.

शुक्र ग्रह प्रेमिका आणि पत्नीचं प्रतिनिधित्व करतो. तर राहु भ्रम, ड्रग्स, औषधं, चुकीचं कामं, नशा, प्रसिद्धी, धन, यश यांना प्रोत्साहान देतो. कुंडलीत राहु आणि शुक्राची युती आनंद देते. कारण या दोघांचा स्वभाव काही क्षेत्रांमध्ये मिळताजुळता आहे.

मेष : शुक्र गोचर या राशीच्या जातकांना सौंदर्य आणि आकर्षणात सुधारणा करेल. राहु आणि शुक्राच्या युतीमुळे कामुकता वाढल्याचं दिसून येईल. या काळात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. पण या काळात विनाकारण पैशांची उधळण आपल्या हातून होईल. त्यामुळे या काळात पैसे जरा जपूनच वापरा. कामाच्या ठिकाणी अचानकपणे मोठी जबाबदारी मिळू शकते.

तूळ : शुक्र राहु युती या राशीच्या सप्तम भावात होत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचण निर्माण होऊ शकते. शुक्र या राशीचा लग्नेश असल्याने दैनिक दिनचर्यावर प्रभाव पडेल. त्यामुळे एखाद्या स्त्रीशी जवळीक आल्यास सावध राहा. कारण तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. असं असलं तरी आर्थिक स्थिती या काळात सुधारेल.

धनु : या राशीच्या पंचम भावात शुक्र आणि राहुची युती होत आहे. त्यामुळे संतान सुख देणारी स्थिती आहे. संतानप्राप्ती होताना काही अडचण येत असेल. तर या काळात दिलासा मिळू शकतो. प्रेम संबंधांसाठी हे गोचर लाभदायी आहे. त्याचबरोबर कमी मेहनत करून चांगलं फळ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.