18 वर्षानंतर मीन राशीत सूर्याला राहु पकडणार कोंडीत, या राशींनी जरा सांभाळूनच

सूर्य आणि राहुचं एकमेकांशी पटत नाही. कारण हे दोन्ही ग्रह एकत्र आले की ग्रहण योग लागतो. त्यामुळे त्यांच्या युतीचा राशीचक्रावर विपरीत परिणाम होतो. असं असताना 18 वर्षानंतर गुरुच्या मीन राशीत हे दोन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल.

18 वर्षानंतर मीन राशीत सूर्याला राहु पकडणार कोंडीत, या राशींनी जरा सांभाळूनच
18 वर्षानंतर मीन राशीत राहुच्या तावडीत सापडला सूर्य, राशीचक्रात होणार अशी उलथापालथ
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 3:12 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहु-केतु यांना पापग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे. हे दोन्ही ज्या ग्रहांसोबत एकत्र त्यांचा गुण नाही पण वाण लागतो. त्यामुळे ते ग्रह तशीच फळं देतात. सध्या राहु ग्रह हा दीड वर्षांसाठी मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे संपूर्ण राशीचक्र फिरून एका राशीत येण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी लागतो. आता राहु मीन राशीत असून 14 मार्च रोजी सूर्य या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एका महिन्यासाठी दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 46 मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल आणि ग्रहण योग सुटेल. या दरम्यान चंद्रग्रहण देखील होणार आहेय. 25 मार्चला धुळीवंदन या दिवशी ग्रहण लागेल. पण हे भारतातून दिसणार नसल्याने वैदीक नियम पाळण्याची गरज नाही. एकंदरीत एक महिन्याचा कालावधी काही राशींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते..

वृषभ : या राशीच्या एकादश भावात दोन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुले काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही कामं होता होता राहतील.कामाच्या ठिकाणीही बॉसकडून नकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यातही काही संकट एकामागून एक येतील. आपल्या बोलण्यामुळे नातेसंबंध दूरवण्याची शक्यता आहे. मुलांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.

सिंह : या राशीच्या षष्टम स्थानात दोन ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे निर्णय क्षमतेत उणीव दिसून येईल. आत्मविश्वास कमी झाल्याचं जाणवेल. काही निर्णय या कालावधीत चुकू शकतात. त्यामुळे बॅकफूटवर जाण्याची वेळ येईल. उद्योगधंद्यातही काही तोटा सहन करावा लागू शकतो. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळणार नाही. तसेच भांडणं होण्याची शक्यता आहे.

मकर : या राशीच्या तिसऱ्या स्थानात सूर्य राहुची युती होत आहे. काही कौटुंबिक कारणामुळे जीव अस्वस्थ होईल. काय करू आणि काय नको असं होईल. एखादा निर्णय घेताना एक आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायात जोखिम न घेतलेली बरी राहील. कारण ग्रहमान या कालावधीत हवं तसं नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....