Rajyog : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु देणार तीन राशींना साथ, कशी ते जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे बऱ्याच घडामोडी घडत असतात. अशीच स्थिती ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाहायला मिळणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Rajyog : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु देणार तीन राशींना साथ, कशी ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:55 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या स्थितीनुसार जातकांना फळं देत असतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अशीच काहीशी अनुभूती तीन राशीच्या जातकांना अनुभवायला मिळणार आहे. कारण गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ योग म्हणून गणना होते. हा योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असतो त्या व्यक्तीला पैसा, मान सन्मान, प्रतिष्ठा यांची अनुभूती मिळते. सध्या गुरु ग्रह मेष राशीत ठाण मांडून आहे. 7 ऑगस्टला चंद्र या राशीत येणार आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

7 ऑगस्टला चंद्र मीन राशीतून मेष राशीत्र दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत राहु आणि गुरुची साथ मिळणार आहे. 9 ऑगस्टला चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल आणि हा योग संपुष्टात येईल.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

मीन : गजकेसरी योग या राशीच्या धन भावात तयार होणार आहे. त्यामुळे जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच आर्थिक गणितही योग्य पद्धतीने जुळून येतील. सव्वा दोन दिवसाच्या काळात तुम्ही गुंतवणूकही करू शकता. पण यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. तसेच त्याचा मोबदला तुम्हाला दिला जाईल. विदेशाशी निगडीत तुमचा व्यवसाय असेल तर चांगला परतावा मिळू शकतो.

कर्क : या राशीच्या कर्मभावात गजकेसरी राजयोग तयार होत आहे. यामुळे जातकांना काम धंद्यात यश मिळेल. केलेल्या कामाचं पूर्ण फळ या काळात मिळेल. प्रगतीची शिखरं या काळात गाठता येतील. तसेच बेरोजगार असलेल्या तरुणांना अपेक्षित नोकरी मिळू शकते. तसेच उद्योगपती असाल तर तुम्हाला चांगली प्रचिती या काळात अनुभवायला मिळेल. नवीन शाखा या काळात सुरू करू शकता.

सिंह : या राशीच्या नवम भावात गजकेसरी योग तयार होत आहे. या स्थानाला भाग्यस्थान म्हंटलं जातं. त्यामुळे या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळेल. आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल. या काळात मोठी जबाबदारी पार पाडाल. भौतिक सुखांमध्ये वाढ होऊ शकते. घरात काही मंगलकार्य पार पडतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.