Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी मंगळ ग्रहाने बदलली राशी, कोणत्या राशींचे चमकणार नशीब
मंगळाचे संक्रमण होताच काही राशींना कठीण काळ येईल आणि काही राशींसाठी हा काळ चांगला राहील. ज्या राशींसाठी हा काळ फायदेशीर ठरेल, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
आज 11 ऑगस्टला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) साजरा होत आहे. रक्षाबंधनापूर्वी 10 ऑगस्टला मंगळाने राशी बदल केला आहे. मंगळ मेष राशीत गोचर (Mangal Gochar) करीत आहे. मंगळाचे संक्रमण होताच काही राशींना कठीण काळ येईल आणि काही राशींसाठी हा काळ चांगला राहील. ज्या राशींसाठी हा काळ फायदेशीर ठरेल, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
- वृषभ- या राशीतील बदल खूप फायदेशीर ठरणार आहेत. या काळात शत्रूंचा पराभव होणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे, गुंतवणुकीत नफा होईल, पण तुम्हाला हुशारीने गुंतवणूक करावी लागेल. जुने वाद मिटतील.
- तूळ- तूळ राशीच्या लोकांना यावेळी धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक लाभ होईल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल.
- सिंह- ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे संक्रमण शुभ राहील. कोणत्याही कामात हात लावलात तरी यश मिळेल. आर्थिक प्रगती होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती चांगली होताना दिसते. शौर्य आणि धैर्य वाढण्याची शक्यता आहे.
- कर्क- राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ राहणार आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. जुन्या कामांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगती होताना दिसते. उत्पन्नात वाढ होताना दिसते. कामाच्या ठिकाणीही लोकांचे सहकार्य मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
- कुंभ- कुंभ राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध चांगले राहतील. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसते. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा नवीन घर घेऊ शकता. तुम्ही नवीन फ्लॅट बुक करू शकता किंवा नवीन फ्लॅट खरेदी करू शकता.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)