Ram Navami 2023: राम नवमीला ग्रहांचा अनोखा मेळा, दुर्लभ योगांमुळे या राशींना मिळणार आशीर्वाद
रामनवमीचा उत्सव 30 मार्च 2023 रोजी आहे. या दिवशी ग्रह आणि काही दुर्लभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना विशेष फायदा होणार आहे.
मुंबई : हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला भगवान रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला राम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. यंदा राम नवमी उत्सव 30 मार्चला असणार आहे.रामायण कथास रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम स्तुतीचा पाठ केल्याने चांगली फळं मिळतात. या राम नवमीला शुभ आणि दुर्लभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना या स्थितीचा फायदा होणार आहे. रामनवमीला अमृतसिद्धी, गुरु पुष्य, रवि योग आणि सर्वार्थसिद्धि योग असणार आहे. या तीन योगांमुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होईल.
अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धी योग 30 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल. राम नवमीला चंद्र मिथुन राशीतून कर्क राशईत प्रवेश करेल. भगवान रामनच्या कुंडलीतही चंद्र कर्क राशीत होता. या व्यतिरिक्त बुध ग्रह उदीत होणआर आहे.रामनवमी 29 मार्चला रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी 30 मार्चला रात्री 11 वाजून 31 मिनिटांनी संपेल.
या राशीच्या लोकांना होईल फायदा
सिंह – या राशीच्या जातकांना हा योग शुभ ठरणार आहे. प्रभू रामांची कृपा असेल. कर्ज मुक्तीसाठी हा दिवस चांगला आहे. उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण होतील. व्यवसाय आणि नोकरीत लाभ मिळेल.
तूळ- या राशीच्या लोकांनाही रामनवमी फलदायी ठरेल. या काळात शुभ बातम्या कानावर पडतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान सन्मान वाढेल.
वृषभ – या राशीच्या जातकांना नशिबाची जोरदार साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. संपूर्ण दिवसच चांगला असल्याने गुंतवणूक करू शकता. गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली काम पुन्हा सुरु होतील.
रामनवमीचा पूजाविधी
रामनवमीला सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून हातात अक्षतका घेऊन व्रत आणि संकल्प करा. त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्या. त्यानंतर प्रभू रामांना गंगाजल, फुलं, हार, पाच प्रकारचे फळं, मिठाई अर्पण करा. प्रभू रामांना तुळशी पत्र आणि कमळाचं फूल अर्पण करा. त्यानंतर रामरक्षास्तोत्राचं पठण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)