30 वर्षानंतर दसऱ्याला ग्रहांचा दुर्मिळ योग, जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार लाभ
दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. पण या शुभ मुहूर्तावर ग्रहांची अनोखी स्थिती आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे.
मुंबई : हिंदू धर्मात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतीही शुभ सुरुवात करता येते. खरं तर या दिवशी पंचांग वगैरे पाहण्याची गरज नसते. पण यंदाचा दसरा अर्थात विजयादशमी हा सण खास असणार आहे. एक तर या दिवसी पंचक पडत आहे. दुसरीकडे ग्रहांची दुर्मिळ अशी स्थिती निर्माण झाली आहे. या दिवशी शनि आपल्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होतो. तसेच गुरु आणि शुक्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. समसप्तक दृष्टीने एकमेकांकडे पाहात आहे. तूळ राशीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण झाला आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
कर्क : या राशीचे जातक शनिच्या अडीचकीखाली आहे. पण ग्रहांची स्थिती काही काळासाठी अनुकूल ठरणार आहे. शुभ मुहूर्तासोबत ग्रहांची उत्तम साथ लाभणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच योग्य गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उद्योगधंद्यातील लाभ मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील.
तूळ : गेल्या काही महिन्यांपासून असलेली प्रतिकूल स्थिती आता बदलताना दिसेल. बुधादित्य योगामुळे निश्चितच फायदा होईल. आर्थित स्थिती या काळात मजबूत होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना अचानक धनलाभ होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराकडून चांगली मदत मिळेल.
कुंभ : ही रास शनिची स्वरास असून यात राशीत शनि विराजमान आहे. दसऱ्याच्या दिवशी तयार होणारा दुर्मिळ योग लाभकारी ठरणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उसनवारी फेडण्यासाठी हाती पैसा असेल. त्यामुळे डोक्यावरचा भार हलका होईल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून खूश व्हाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित ऑफर मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)