या तीन राशींना बंपर लॉटरी, शुक्राची चाल घडवणार चमत्कार, नव्या वर्षात फक्त लाभच लाभ
शुक्र ग्रह सध्या मकर राशीमध्ये संक्रमण करत आहे.वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एका राशीमध्ये शुक्र एक महिना राहतो, शुक्र 28 डिसेंबरला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्र ग्रह सध्या मकर राशीमध्ये संक्रमण करत आहे.वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एका राशीमध्ये शुक्र एक महिना राहतो, शुक्र 28 डिसेंबरला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ ही शनी देवांची रास आहे. शुक्राच्या कुंभ राशीतील संक्रमणाचा परिणाम हा बाराही राशींवर होणार आहे. मात्र शुक्र कुंभ राशीत येताच तीन राशींच्या लोकांचं नशीब चमकणार आहे. या राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ, आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग बनत आहेत, जाणून घेऊयात या राशींबद्दल.
वृषभ रास
शुक्राचे कुंभ राशीत होणारे संक्रमण वृषभ राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळून देणार आहे. कारण वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे या काळात वृषभ राशींचे जे लोक बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या काळात वृषभ राशीचे लोक आपल्या जीवनसाथीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतात.नोकरीमध्ये देखील प्रमोशनचे योग बनत आहेत.
मेष राशी
शुक्राचं कुंभ राशीतील संक्रमण हे मेष राशींना विविध प्रकारचा लाभ मिळून देणार आहे, मेष राशीच्या लोकांच्या इनकममध्ये अचानक वाढ होऊ शकते.तसेच या राशींच्या लोकांना नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायामध्ये देखील मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होण्याची शक्यता आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. चांगली नोकरी मिळण्याची देखील शक्यता आहे.
मिथून रास
शुक्राचं कुंभ राशीत होणारं संक्रमण हे मिथून राशीला देखील फायद्याचं ठरणार आहे, या राशींना लोकांना अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. तसेच या लोकांचा परदेश यात्रेचा देखील योग या काळात येऊ शकतो. व्यवसायामध्ये देखील मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून एखाद काम रखडलं तर ते देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)