Zodiac | ‘बिग बॉस’ राशी सांगतील तुमच्या बॉसचा स्वभाव, काय आहे त्यांच्या मनात…

कामावर जाणाऱ्या सर्वांच्या आयुष्यातील (life) महत्त्वाची व्यक्ती म्हणजे 'बॉस' (Boss). कोणच्याही आयुष्यात बॉसची भूमिका खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा बॉसच्या मुडवर आपला मुड अवलंबून असतो. पण जर तुम्हाला तुमच्या बॉसच्या स्वभावाची ओळख करायची असेल तर या गोष्टीमध्ये राशी (Rashi) तुम्हाला मदत करतील.

Zodiac | 'बिग बॉस' राशी सांगतील तुमच्या बॉसचा स्वभाव, काय आहे त्यांच्या मनात...
zodiac
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:55 AM

मुंबई :  कामावर जाणाऱ्या सर्वांच्या आयुष्यातील (life) महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ‘बॉस’ (Boss). कोणच्याही आयुष्यात बॉसची भूमिका खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा बॉसच्या मुडवर आपला मुड अवलंबून असतो. पण जर तुम्हाला तुमच्या बॉसच्या स्वभावाची ओळख करायची असेल तर या गोष्टीमध्ये राशी (Rashi) तुम्हाला मदत करतील. यामुळे तुम्हाला तुमच्या बॉसचा स्वभाव ओळखण्यास मदत होईल. प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव आणि विचार त्याच्या जन्म कुंडलीच्या ग्रहांच्या स्थितीनुसार असतात. काही नम्र स्वभावाचे असतात तर काही स्वार्थी. काही लोकांना खूप क्रोध येतो परंतु ते तो राग आतल्याआत दाबून घेतात. तर काही लोकं राग आल्यावर विचारन करता कुठलंही पाऊल उचलायला तयार होतात. जर तुम्हाला तुमच्या बॉसचा स्वभाव कळाला तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील. चला तर मग जाणून घेऊयात राशींचे स्वभाव.

मेष ( 21 March – 20 April) आणि वृश्चिक (23 October- 22 November) ज्योतिष शास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीचे लोक मजेदार स्वभावाचे असतात. मात्र, शिस्तीच्या बाबतीतही ते कडक असतात. त्यांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते. त्यांची आवड संगीत आणि राजकारणात आहे. तसेच वृषभ आणि तूळ राशीशी यांचा ताळमेळ चांगला जुळून येत नाही.

वृषभ (20 April-21 May) आणि तूळ (23 sptember – 23 October) वृषभ आणि तूळ राशीचे लोक स्वभावाने कल्पक असतात. त्यांचा स्वभाव खूप हट्टी असतो. पण ते नम्र स्वभावाचे असतात. याशिवाय वृश्चिक आणि मिथुन राशीची लोक एकमेकांसोबत काम करत नाहीत.

मिथुन ( 21 May- 21 June) आणि कन्या (23 August-23 Sptember) मिथुन आणि कन्या राशीचे लोक संयमी आणि गंभीर स्वभावाचे असतात. या राशीचे लोक फक्त स्वतःच्या आवडीबद्दल बोलतात. कोणतेही काम करण्यापूर्वी गांभीर्याने विचार करतात. त्यांच्या ज्ञानाची आणि कृतीची स्तुती केली तर ते आनंदी होतात.

कर्क (21 June -23 July) कर्क राशीचे लोक धूर्त आणि भावनिक असतात. असे लोक धार्मिक स्वभावाचेही असतात. तसेच, ते लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन तुम्ही त्यांच्यावर वेगळी छाप पाडू शकता.

सिंह (23 July -23 August) सिंह राशीचे लोक बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि ज्ञानी असतात. ते मनाने स्वच्छ आणि प्रामाणिक असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा आवडतो मग ते नातं असो की काम. सिंह राशीच्या लोकांना स्तुती करणे आवडत नाही. ते जास्त कोणाशी बोलत नाहीत.

धनु (23 November – 22 December) आणि मीन (19 February– 21 March) धनु आणि मीन राशीचे लोक संवेदनशील, भावनिक असतात. त्याच वेळी, ते धार्मिक देखील असतात. जर तुम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललात तर त्यांना आनंद होईल.

मकर (22 December– 20 January) आणि कुंभ (20 January–19 February) मकर आणि कुंभ राशीचे लोक खूप शिस्तप्रिय असतात. त्यांना भांडणे आवडत नाही. ते भावनिक आणि दयाळू स्वभावाचे आहेत. पण तरीही अनेक वेळा ते बाहेर कठोर असल्याचे भासवतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | ”घर का भेदी लंका ढाए” अशी परिस्थिती निर्माण होईल , आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

Astro Ideas: होळीच्या दिवशी हे उपाय करा, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...