Ravi Pradosh : या तारखेला आहे रवी प्रदोष व्रत, राशीनुसार केलेल्या या उपायांनी लाभेल महादेवाची कृपा
प्रदोष व्रत 10 डिसेंबरला आहे. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत रविवारी साजरे केले जात असल्याने याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाईल. ज्योतिष शास्त्रात लवकर लग्नासाठी प्रदोष व्रतावर विशेष उपाय केले जातात.
मुंबई : प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित व्रत मानले जाते. हे व्रत दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत 10 डिसेंबरला आहे. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत (Pradosh Vrat) रविवारी साजरे केले जात असल्याने याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाईल. ज्योतिष शास्त्रात लवकर लग्नासाठी प्रदोष व्रतावर विशेष उपाय केले जातात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर प्रदोष व्रतामध्ये राशीनुसार भगवान शंकराला या वस्तू अर्पण करा. याने भगवान शिव तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव दूर करतात.
राशीनुसार या गोष्टी अर्पण करा
मेष : मेष राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी गंगाजलात बेलपत्र मिसळून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रतात गंगाजलात दुर्वा आणि बेलपत्र मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी गंगाजलात कच्चे दूध आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी गंगाजलात सुपारीची पाने किंवा सुपारी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताला गंगाजलात अत्तर मिसळून महादेवाला अभिषेक करावा.
धनु : धनु राशीच्या लोकांनी अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
मकर : मकर राशीच्या लोकांनी लवकर लग्नासाठी प्रदोष व्रताला गंगाजलात काळे तीळ, बेलची पाने आणि सुगंध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी प्रदोष काळात गंगाजलात गुलाबजल आणि उसाचा रस मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
मीन : मीन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी कच्च्या दुधात विड्याची पाने आणि दूर्वा मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)