Sadesati : शनिवारी अशा प्रकारे करा पिंपळाच्या झाडाची पुजा होईल साडेसातीच्या त्रासातून सुटका

असे मानले जाते की साडेसातीचा हा कालावधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आव्हाने आणि अडचणी आणू शकतो. या काळात काही उपाय केल्यास अवश्य लाभ मिळेल.

Sadesati : शनिवारी अशा प्रकारे करा पिंपळाच्या झाडाची पुजा होईल साडेसातीच्या त्रासातून सुटका
शनिImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 3:27 PM

मुंबई, हिंदू पौराणिक कथांमध्ये शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनिदेव शिस्त, जबाबदारी आणि कठोर परिश्रमाशी संबंधित आहेत. हिंदू ज्योतिष शास्त्रात शनीच्या 12 राशींमध्ये होणार्‍या संक्रमणाला साडेसाती (Sadesati Upay) असे म्हणतात. असे मानले जाते की हा कालावधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आव्हाने आणि अडचणी आणू शकतो. या काळात काही उपाय केल्यास अवश्य लाभ मिळेल.

पिंपळाच्या झाडाची पूजा

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आणि साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्याचा मार्ग मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, पीपळ वृक्ष पवित्र आहे आणि शनिदेवामुळे होणार्‍या त्रासांपासून माणसाला मुक्त करण्याची शक्ती आहे.

पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पवित्र आहे

पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात बोधी वृक्ष म्हणूनही ओळखले जाते आणि ते पवित्र मानले जाते. पीपळाच्या झाडामध्ये आध्यात्मिक आणि औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

हे सुद्धा वाचा

भगवान विष्णू आणि बुद्ध यांच्याशी संबंधित आहे पिंपळ वृक्ष

पौराणिक मान्यतेनुसार, पिंपळ वृक्ष भगवान विष्णू आणि भगवान बुद्ध यांच्याशी देखील संबंधित आहे, ज्यांना वृक्षाखाली ध्यान केल्याने ज्ञान प्राप्त झाले असे मानले जाते. पिंपळाचे झाड हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.

अशाप्रकारे पीपळ वृक्षाची पूजा करावी

पिंपळाच्या झाडाची पूजा सहसा झाडाला फुले व नैवेद्य दाखवून केली जाते. यासोबतच ते झाडाची प्रदक्षिणाही करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

शनी ग्रहासाठी काही उपाय

लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.

एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.