30 वर्षांनी ग्रहमंडळात असं काही घडतंय, शनि सूर्यामुळे या राशींना येणार ‘अच्छे दिन’

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात उलथापालथ होत असते. यामुळे काही शुभ अशुभ योग जुळून येतात. असाच एक योग 30 वर्षानंतर जुळून येत आहेत. यामुळे तीन राशींच्या जातकांना लाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात याबाबत

30 वर्षांनी ग्रहमंडळात असं काही घडतंय, शनि सूर्यामुळे या राशींना येणार 'अच्छे दिन'
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 10:23 PM

ज्योतिशशास्त्रात ग्रहांचं खूप महत्त्व आहे. ग्रहांची स्थिती मानवी जीवनावर प्रभाव टाकत असते. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे इथपासून कुठे नजर आहे हे महत्त्वाचं ठरतं. ग्रहांच्या स्थितीमुळे राशीचक्रात उलथापालथ होत असते. त्याचा प्रभाव राशीचक्रातील 12 राशींवर होत असतो. असा एक योग 30 वर्षांनंतर जुळून आला आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होणार असं ज्योतिष सांगताहेत. ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 ऑगस्टपासून स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत गोचर करत आहे. तर शनिदेव 30 वर्षानंतर स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 डिग्रीवर आहे. म्हणजेच एकमेकांपासून 7 व्या स्थानावत असणार आहेत. यामुळे समसप्तक योग तयार झाला आहे. या योगामुळे राशीचक्रात उलथापालथ होईल. पण तीन राशींना या स्थितीचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशींबाबत

या तीन राशींना मिळणार लाभ

कुंभ : या राशीच्या लोकांना समसप्तक योग लाभदायी ठरणार आहे. साडेसातीचा मधला टप्पा सुरु असताना काही सकारात्मक गोष्टी घडतील. खासकरून नोकरी करणाऱ्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळेल. तसेच वैवाहिक जीवनात सुरु असलेलं तणावाचं वातावरण निवळेल. त्यामुळे मनाला एक शांती लाभेल. गेल्या काही दिवसांपासून हाती घेतलेली कामंही पूर्ण होतील. त्यामुळे थोडा दिलासा मिळेल.

मेष: मुळात या राशीच्या जातकांना कोणतंही गोष्ट उशिरा झालेली आवडत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं आणि कामाचा वाढता पसारा पाहून चिडचिड होणं साहाजिकच आहे. पण आता सूर्य आणि शनिच्या स्थितीचा लाभ मिळेल. अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. त्यामुळे अडकलेले पैसा हाती येईल. कोणतंही काम हाती घेतलं की तडीस नेता येईल.

मिथुन : या राशीच्या जातकांना शनि आणि सूर्य उत्तम साथ देतील. देश विदेशात फिरण्याचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. कोणाची उसनवारी असेल तर या काळात फेडून टाका. तसेच अनावश्यक खर्चांना आळा घालणं गरजेचं आहे. नवी कामं हाती येतील. त्यातून अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.