शनि, बुध युती; एप्रिलमध्ये या राशींच्या लोकांचं नशीब घोड्यासारखं धावणार, वाईट दिवस संपले
सध्या शनि देव हे कुंभ राशीमध्ये आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. मात्र 29 मार्चला शनि देव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. मात्र शनि देव जरी राशी परिवर्तन करणार असले तरी देखील ते त्याच नक्षत्रात राहणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठरावीक काळानंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. ग्रह कधी-कधी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. तर कधी-कधी एका नक्षत्रातून दुसर्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतात. ग्रहांच्या राशी आणि नक्षत्राचा परिणाम हा बाराही राशींच्या लोकांवर पडतो. कधी हा प्रभाव शुभ असतो तर कधी-कधी अशुभ देखील असू शकतो असं ज्योतिष शास्त्र सांगतं. शनि देवाची चाल ही सर्वात धिमी असते, असं मानलं जातं. शनि देवांना एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा वेळ लागतो. शनि देव राशींसोबतच आपलं नक्षत्र देखील बदलत असतात.
सध्या शनि देव हे कुंभ राशीमध्ये आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. मात्र 29 मार्चला शनि देव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. मात्र शनि देव जरी राशी परिवर्तन करणार असले तरी देखील ते त्याच नक्षत्रात राहणार आहेत. पूर्वभाद्रपदा हे नक्षत्र गुरुचं नक्षत्र मानलं जातं. शनि देवांचं राशी परिवर्तन आणि पूर्वभाद्रपदा हा योग अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. तर काही राशींवर याचा अशुभ प्रभाव देखील पडणार आहे. या राशींच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. मात्र काही राशींच्या लोकांचं या योगामुळे नशीब चमकणार आहे. सध्या शनि देव हे पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये आहेत, तीन एप्रिल रोजी बुध देखील याच नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनि आणि बुधाची युती अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
मिथुन रास – शनि देव आणि बुध युतीचा मिथुन राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माचं फळ मिळणार आहे. त्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचा योग असून, उत्पन्नाचं एखादं दुसरं साधन देखील त्यांना मिळू शकतं. व्यवसायात देखील मोठा फायदा होणार आहे.
कर्क रास – कर्क राशीसाठी देखील शनि देव आणि बुधाची युती फलदायी ठरणार आहे, गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेलं एखादं मोठं काम या काळात पूर्ण होऊ शकतं. नोकरीमध्ये देखील यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती देखील उत्तम राहणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)