खूप सोसलं आता शनि देव करणार न्याय, एप्रिलपासून या राशींचं नशीब घोड्यासारखं धावणार
ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देव यांना कर्माचं फळ दाता आणि न्याय देवता म्हटलं आहे. शनि देव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ आणि दंड देतात.

ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देव यांना कर्माचं फळ दाता आणि न्याय देवता म्हटलं आहे. शनि देव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ आणि दंड देतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनि देवाची चाल ही खूप संथ असते. ते एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतात. सध्या शनि देव हे आपल्या स्वत:च्या राशीमध्ये गोचर करत आहेत. त्यानंतर ते 29 मार्चला कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. याचा बाराही राशींवर वेगवेगळा परिणाम होणार आहे.
शनि देव 29 मार्चला कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनि देव हे मीन राशीमध्ये अस्त अवस्थेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर सहा एप्रिल रोजी शनि देवांचा मीन राशीमध्ये उदय होणार आहे. शनि देवाच्या उदयामुळे काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार असून हा उदय त्यांच्यासाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊयात त्या राशींबद्दल
कर्क रास – कर्क राशींच्या लोकांना शनि देवाचा उदय हा खूप शुभ फळ देणारा ठरणार आहे. शनि देव कर्क राशीच्या 9 व्या भावात उदित होणार आहेत. शनि देवाच्या उदयामुळे या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. घरामध्ये सुख, समुद्धी येणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंदाचं वातावरण राहील.
कन्या रास – कन्या राशींच्या लोकांसाठी शनि देवाचा उदय हा चांगलं फळ देणारा ठरणार आहे. शनि देव कन्या राशीच्या सातव्या भावात उदित होणार आहेत. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. धन-धान्यामध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेली कामं मार्गी लागणार आहेत. करिअरमध्ये देखील मोठं यश मिळण्याचा योग आहे. एखादं नवीन वाहन खरेदी करू शकता.
धनु रास – धनु राशीला देखील शनि देवाचा उदय फलदायी ठरणार आहे. शनि देव धनु राशीच्या चौथ्या भावामध्ये उदीत होणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक फायदे होण्याचा योग आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)