Astrology News : अमावस्या, सूर्यग्रहण, शनि संक्रमण; ‘या’ लोकांचा खडतर काळ सुरू, शनि दाखवणार रौद्र रूप
Saturn Transit 2025 : आजपासून ज्योतिषशास्त्रातल्या एका राशीच्या लोकांचा खडतर काळ सुरू होणार आहे. शनि संक्रमण, सूर्यग्रहण आणि शनि अमावस्येचा विपरीत परिणाम या राशीवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे शनिच्या साडेसातीचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे.

शनि संक्रमण, सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या असे 3 योग जुळून येत असल्याने ज्योतिषशास्त्रात आजचा दिवस महत्वाचा आहे. 29 मार्च रोजी होत असलेलं शनि ग्रहाचं संक्रमण हे सर्वात मोठं संक्रमण मानलं जातं. याचा सगळ्याच राशींच्या जीवनावर वेगवेगळा परिणाम होतं असतो. आज फक्त शनि संक्रमण होणार नाही आहे, तर त्याबरोबर सूर्यग्रहण देखील आहे. आज मकर राशीची साडेसाती संपणार आहे. अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या मकर राशीचा चांगला काळ आता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या एका राशीला मात्र अडचणींचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागणार आहे.
कोणत्या राशीची डोकेदुखी वाढणार?
दर अडीच वर्षांनी होणारे शनीचे संक्रमण यावेळी अधिक खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या विशेष दिवशी सूर्यग्रहण होत आहे. 29 मार्चला शनीच्या संक्रमणासह सूर्यग्रहणाचा योगायोग अत्यंत दुर्मिळ आणि विशेष आहे. शनि आणि सूर्य हे ज्योतिषशास्त्रात शत्रू मानले जातात. त्यामुळे एकाच दिवशी एवढा मोठा बदल दोन्ही ग्रहांनी घडवून आणणे विशेष आहे. यासह शनि मीन राशीत प्रवेश करत आहे, जिथे ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आधीच उपस्थित आहे. म्हणजेच काय तर सूर्यग्रहण मीन राशीत होत असून 29 मार्चपासून मीन राशीत शनि आणि सूर्याचा संयोग होणार आहे. हा संयोग अतिशय धोकादायक आहे आणि त्याचा सर्वात वाईट परिणाम मीन राशीवर होताना बघायला मिळेल.
शनि मीन राशीत प्रवेश करताच साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. हा साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो. साडेसातीच्या दुसऱ्या चरणात व्यक्तीला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. या काळात धनहानी, आजार किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. एकूणच या 3 परिस्थितींमुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण जाणार आहे. 14 एप्रिलपर्यंत सूर्य मीन राशीत राहील आणि शनीच्या युतीत राहील. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी या काळात ताकही फुंकुन प्यावं, अशी परिस्थिती असणार आहे. पुढच्या अडीच वर्षांचा काळ हा प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करण्याचा असणार आहे. मीन राशीच्या लोकानी या काळात संघर्ष टाळावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)