Shani Mahadasha: सहा महिने ‘या’ तीन राशींवर असेल शनीची वक्रदृष्टी; सावधरीत्या टाकावे लागेल प्रत्येक पाऊल!

शनिची साडेसाती,अडीच वर्ष किंवा शनिच्या महादशेचा (shani mahadasha) आयुष्यात कमीत कमी एकदा तरी सामना प्रत्येकाला करावा लागतो. न्यायदेवता शनि प्रत्येकाला त्यांच्या कर्मांच्या आधारावर शुभ-अशुभ प्रभाव देतात. ज्याचे जसे कर्म असते त्याला तसाच न्याय शनि देव (shani dev) देतात. ज्यावेळी शनि ग्रह राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनिची साडेसाती सुरू होते तर काही राशींवर शनी अडीच […]

Shani Mahadasha: सहा महिने 'या' तीन राशींवर असेल शनीची वक्रदृष्टी; सावधरीत्या टाकावे लागेल प्रत्येक पाऊल!
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:55 PM

शनिची साडेसाती,अडीच वर्ष किंवा शनिच्या महादशेचा (shani mahadasha) आयुष्यात कमीत कमी एकदा तरी सामना प्रत्येकाला करावा लागतो. न्यायदेवता शनि प्रत्येकाला त्यांच्या कर्मांच्या आधारावर शुभ-अशुभ प्रभाव देतात. ज्याचे जसे कर्म असते त्याला तसाच न्याय शनि देव (shani dev) देतात. ज्यावेळी शनि ग्रह राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनिची साडेसाती सुरू होते तर काही राशींवर शनी अडीच वर्षांची ढिय्या सुरू होते. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) शनि एखाद्याच्या जन्मराशीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व बाराव्या स्थानात असेल तर शनिची साडेसाती म्हटली जाते. तसेच जेव्हा शनि संक्रमण करत चौथ्या व आठव्या स्थानात असतो तेव्हा अडीच वर्ष शनिचा प्रभाव राहतो. 12 जुलै रोजी शनि पुन्हा राशी बदलणार आहे. यापूर्वी शनीने 29 एप्रिल 2022 रोजी आपली राशी बदलली होती. या काळात शनी कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. जाणून घेऊया कोणत्या राशीवर शनिची दशा सुरू होईल आणि कोणाला सुटका मिळेल.

12 जुलै 2022 ते 17 जानेवारी 2023 पर्यंत, शनी मकर राशीत असेल: या 6 महिन्यांच्या कालावधीत, शनी त्याच्या मागील संक्रमण राशीत मकर राशीत राहील. 29 एप्रिल 2022 रोजी शनीच्या दशातून मुक्त झालेल्या राशींसाठी हा काळ कठीण असू शकतो. शनि पुन्हा मकर राशीत येत असल्याने शनीची दशा या राशींवर पुन्हा प्रभाव टाकू लागेल.

या राशी पुन्हा शनीच्या ताब्यात येतील: शनीचा मकर राशीत प्रवेश होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना परत ढय्या सुरु होईल, तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना यापासून मुक्ती मिळेल. 12 जुलै रोजी मकर राशीत शनीचे संक्रमण काही महिन्यांसाठी कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा दिलासा देईल. दुसरीकडे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांचा त्रास वाढेल. या राशीच्या लोकांना 17 जानेवारी 2023 रोजीच पूर्ण मुक्ती मिळेल.

‘या’ राशींवरही राहील शनीचा प्रभाव: शनि पुन्हा मकर राशीत प्रवेश करत असताना मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचीही शनि साडेसाती राहील. दुसरीकडे, मीन राशीच्या लोकांना यापासून 6 महिने मुक्ती मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.