शनि मंगळ युतीमुळे अशुभ असा षडाष्टक योग, तीन राशींना 30 जूनपर्यंत होणार त्रास

ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची स्थितीही खूप महत्त्वाची असते. त्यात पापग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहेत याकडे लक्ष ठेवावं लागतं. शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची अशुभ युती होत आहे. चला जाणून कोणत्या राशींना परिणाम भोगावे लागतील ते

शनि मंगळ युतीमुळे अशुभ असा षडाष्टक योग, तीन राशींना 30 जूनपर्यंत होणार त्रास
शनि मंगळ षडाष्टक योगामुळे तीन राशीच्या जातकांनी राहावं सावध, वाईट परिणामांचा करावा लागेल सामना
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 9:35 PM

मुंबई : जून महिन्यात ग्रहांचे गोचर आणि स्थिती खूपच महत्त्वाची आहे. हिंदू पंचांगानुसार जून महिन्यात शनि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह अशुभ युती तयार करत आहे. शनि आणि मंगळाच्या युतीमुळे षडाष्टक योग तयार होत आहे. पृथ्वी पुत्र मंगळ शनिपासून सहाव्या स्थानात आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे षडाष्टक असा अशुभ योग तयार झाला आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. तर राशीपासून सहाव्या रास असलेल्या कर्क राशीत मंगळ स्थित आहे. कुंभ राशीत शनि अडीच वर्षांसाठी विराजमान आहे. तर 1 जुलैला मंगळ ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर हा षडाष्टक योग संपुष्टात येईल. त्यामुळे 30 जून पर्यंतचा कालावधी तीन राशींची डोकेदुखी वाढवणारा असेल. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या..

या तीन राशींची डोकेदुखी वाढणार

कर्क : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ सध्या कर्क राशीतच विराजमान आहे. त्यामुळे षडाष्टक योगाचे वाईट परिणाम भोगावे लागतील. कर्क राशीत मंगळ स्थित असल्याने त्याचा प्रभाव दिसून येईल. यामुळे या काळात कामाचा ताण जास्त असेल. जीवनात काही चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. काही कामांमध्ये अपयश पदरी पडताना दिसेल. या काळात कोणतंही नवीन काम सुरु करू नका. तसेच कोणत्याही वादात पडू नका. शांत राहून आलेल्या प्रत्येक समस्येचा सामना करा.

सिंह : या राशीच्या जातकांना शनि मंगळ षडाष्टक योगाचा अशुभ परिणाम दिसून येईल. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक वादामुळे डोकं पुरतं भनभनून जाईल. त्यामुळे कोणाशी बोलताना किंवा एखादी कृती करताना काळजी घ्या. जमिनीशी निगडीत कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. नुकसान सहन करावं लागू शकतं. वाहन चालवताना काळजी घ्या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या.

धनु : या राशीच्या जातकांना षडाष्टक योगाची गंभीर फळं भोगावी लागू शकतात. या काळात आर्थिक फटका बसेल. तसेच विनाकारण खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो. नवीन गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा फटका बसू शकतो. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.