शनिच्या उदयानंतर बारा राशींना मिळतंय पाठबळ, आता नक्षत्र प्रवेशानंतर होणार धनलाभ

शनिदेवांच्या स्थितीकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. कारण शनिदेवांमुळे बऱ्याच घडामोडी घडून येतात. त्यामुळे अनेकदा जातकांना त्रासही सहन करावा लागतो.

शनिच्या उदयानंतर बारा राशींना मिळतंय पाठबळ, आता नक्षत्र प्रवेशानंतर होणार धनलाभ
शनिदेवांची बारा राशींवर सुरु आहे कृपा, पुन्हा तेज मिळाल्यानंतर आर्थिक बळ वाढणार
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 7:58 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेवांनी ठाण मांडलं. जवळपास अडीच वर्ष या राशीत मुक्काम असणार आहे. अशा स्थितीत सूर्य जवळ येताच शनिदेवाचं तेज कमी होतं. म्हणजेच शनिदेव अस्ताला जातात. आता 6 जानेवारी 2023 रोजी शनिदेव पुन्हा आपल्या स्थिती आल्याने त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सध्या सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत. असं असतात 15 मार्चला शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिचा उदय आणि शतभिषा नक्षत्रातील प्रवेश यामुळे बारा राशींना पाठबळ मिळणार आहे.

मेष : या राशीच्या जातकांना या स्थितीचा चांगलाच फायदा होईल. ग्रहमान संमिश्र असल्याने लाभ होईल. नोकरी धंद्यात चांगलं यश मिळेल. पण असं असलं तरी नातेसंबंधात मिठाचा खडा पडू शकतो. त्यामुळे संतुलन राखण्याचं आव्हान असणार आहे.

वृषभ : आर्थिक घडामोडींकडे बारीक ठेवणं गरजेचं आहे. कारण या काळात अप्रत्यक्षरित्या लाभ होऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. त्यामुळे निश्चितच फायदा होईल.

मिथुन : या राशीची नुकतीच अडीचकी संपली आहे. त्यामुळे शनितेजाचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आणि नातेसंबंध या काळात सुधारतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क : या राशीच्या जातकांना नुकतीच अडीचकी सुरु झाली आहे. पण तेजोमय कालावधी चांगला जाईल. ग्रहमान विपरीत असलं तरी फायदा होईल. व्यावसायिक संधी चालून येतील. तसेच ज्या कामात हात घालाल त्या कामात यश मिळेल.

सिंह : या राशीच्या जातकांना शनिचं पाठबळ मिळणार आहे. अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी उत्तम काळ आहे. भविष्यात या गुंतवणुकीचा नक्कीच फायदा होईल. सर्व घडामोडी मनासारखे होत असल्याने आनंदी राहाल.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तसेच पदोन्नती किंवा पगार वाढीची दाट शक्यता आहे. पण असलं तरी आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखण्यात यश मिळेल.

तूळ : या राशीची नुकतीच अडीचकी संपली आहे. मात्र शनितेज गेल्याने हवा तसा फरक पडला नव्हता. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो. प्रेम आणि नातेसंबंद यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक : या राशीच्या जातकांना अडीचकीचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी शनि उदय सकारात्मक असेल. मेहनतीच्या जोरावर बऱ्याच गोष्टी मिळवू शकता. घर किंवा जमिनीचा व्यवहार या काळात शक्य आहे. अविवाहित लोकांना या काळात त्रास सहन करावा लागेल.

धनु : या राशीची नुकतीच साडेसाती संपली आहे. त्यामुळे शनि उदयाचा फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कधी विचार केला नसेल अशा अचानक घडू लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे.

मकर : या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. असं असताना शनिदेवा जाताना बरंच देऊन जातात. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण अनुभवाल. कामावर बॉस खुश असल्याने त्याचा उत्तम मोबदला तुम्हाला मिळेल. या काळात तुमचे नातेसंबंध चांगले राहतील.

कुंभ : या राशीत सध्या सूर्य आणि शनि दोन्ही ग्रह विराजमान आहेत. थोड्या दिवसात या राशीतून सूर्यदेव मार्गस्थ होतील. त्यामुळे या राशीच्या जातकांना एकांताची गरज जाणवेल. ध्यानधारणा, योगासने आणि इतर आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षित व्हाल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल.

मीन : या राशीला शनि साडेसातीची पहिली अडीच वर्षे सुरु आहेत. त्यामुळे हा काळ थोडा अडचणीचा असेल पण पाय जमिनीवर ठेवून वागल्यास नक्कीच फायदा होईल. शनिदेवांना नम्रपणा आवडतो याचं भान ठेवा. तुम्हाला या काळात नवीन जबाबदारी मिळू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.