Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani 2023: शनिदेवांच्या उदयानंतर पाच राशींच्या अडचणीत होणार वाढ, आतापासून हे उपाय करा सुरु

शनिदेवांनी कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याच्या प्रभावामुळे तेज कमी झालं होतं. आता शनिदेव सूर्याच्या कक्षेतून दूर गेल्याने हा प्रभाव नाहीसा होणार आहे. त्यामुळे पाच राशींच्या अडचणीत वाढ होईल.

Shani 2023: शनिदेवांच्या उदयानंतर पाच राशींच्या अडचणीत होणार वाढ, आतापासून हे उपाय करा सुरु
अस्ताला गेलेल्या शनिदेवांवरील सुर्याचा प्रभाव होणार दूर, चार राशींसाठी अडचणीचा काळ
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 2:23 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सर्वाधिक लक्ष हे शनिच्या स्थितीकडे असतं. कारण शनिदेवांचा प्रभाव इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वाधिक आणि तातडीने अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे शनि आपल्या राशीला आला की, चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा पापग्रह असला तरी ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावतो. चांगली कर्म असणाऱ्यांना शनिदेव चांगली फळं, तर वाईट कर्म असणाऱ्यांना शनिदेव चांगलाच दणका देतात. आता 5 मार्चच्या रात्री शनिदेव कुंभ राशीत उदीत होणार आहेत. म्हणजेच सूर्यादेवांच्या कक्षेतून दूर जाणार असल्याने स्वताच्या शक्तीने प्रभावित होतील.

शनिदेव स्वताच्या कुंभ राशीत असल्याने अनेकांना दिलासा मिळाला. 17 जानेवरी 2023 रोजी शनि महाराजांनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अस्ताला गेल्याने काही राशींना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा शनिदेव आपल्या येणार असल्याने चार राशींना अडचणीचा काळ असणार आहे.

या राशींनी घ्यावी विशेष काळजी

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा उदय झाला की चांगली फळं मिळतात. तसेच मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम टाकतात. मात्र शनिदेवांचं इतर ग्रहांपेक्षा वेगळी स्थिती असते. कारण न्यायदेवता असल्याने हिशेब बरोबर चुकता करतात. यावेळी मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. आणि कर्क, वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. त्यामुळे या काळात पाच राशींनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

शनिच्या या स्थितीत काय फटका बसेल

शनिदेवांचा उदय झाल्यानंतर काही राशींना काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण निर्णय घेतो खरं पण त्यात अपेक्षित यश मिळत नाही. या काळात जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. त्याचबरोबर कोणालाही पैसे देताना शंभर वेळा विचार करा. अन्यथा पैसे बुडू शकतात. तसेच कामाच्या ठिकाणी हवी तशी साथ मिळणार नाही. हातात घेतलेली कामं अडकून जातील. तसेच या काळात गुंतवणूक विचारपूर्वक करा. कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता देखील आहे.

काय उपाय कराल

शनि साडेसाती आणि अडीचकीच्या काळात मारुतीरायाची उपासना कराल. यामुळे निश्चितच दिलासा मिळेल. मारुतीरायाची उपासना करणाऱ्यांवर शनिदेव अवकृपा करत नाहीत. या काळात हनुमान चालिसा आणि नामस्मरणावर जोर द्या. शनिवारी शनिदेवांची विधीपूर्वक पुजन करा. यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद मिळेल. सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली तीळाचा दिवा लावा. तसेच दूध अर्पण करा. तसेच शनिस्तोत्राचं पठण करा. शनिवारी कावळ्यांना अन्न खाण्यास द्या. तसेच गरजवतांना आपल्या कुवतीनुसार शनिच्या संबंधित वस्तूंचं दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.